Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलच्या महिनाभर आधीच सीएसकेला धक्का! कोटीचा अष्टपैलू संपूर्ण हंगामातून बाहेर

February 20, 2023
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
CSK

Photo Courtesy: Twitter/IPL


इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या 16व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात कोणत्या संघात होणार हेदेखील ठरले आहे. ही स्पर्धा 31 मार्चपासून सुरू होणार आहे. तसेच, स्पर्धेतील साखळी सामन्यांचा शेवट 21 मे रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमने-सामने येणार आहेत. मात्र, स्पर्धेला जवळपास दीड महिन्यांचा अवधी शिल्लक असतानाच चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.

डिसेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल 2023 लिलावात सीएसकेने एक कोटींची बोली लावत आपल्या संघात सामील केलेला न्यूझीलंडचा अष्टपैलू कायले जेमिसन हा या वर्षीच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमूळे तो‌ तीन ते चार महिने मैदानावर दिसू शकणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आलेली. मात्र, त्याने पहिल्या कसोटीतून माघार घेतलेली. ‌‌

जेमिसनची दुखापत गंभीर असल्याने पुढील आठवड्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. ‌‌स्ट्रेस फ्रॅक्चरची ही तीच दुखापत आहे, ज्यामुळे हार्दिक पंड्या व जसप्रीत बुमराह हे बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिले होते. जेमिसन हा वेगवान गोलंदाज तसेच उपयोगी फलंदाज आहे. यापूर्वी त्याने आयपीएलमध्ये ‌‌‌‌‌‌‌रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केलेले.

आयपीएल 2023 साठी सीएसके संघ-

एमएस धोनी(कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलन, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, बेन स्टोक्स, भगत वर्मा, अजय मंडल, निशांत सिंधू, शेख रशीद, अजिंक्य रहाणे.

(CSK All-rounder Kyle Jemieson Out Of IPL 2023 Due To Back Injury)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताकडे सेमीफायनलमध्ये जागा बनवण्याची शेवटची संधी, जाणून घ्या कशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
लागोपाठ दोन पराभवाने ऑस्ट्रेलिया संघात भूकंप, कर्णधार मायदेशी परतला, आता पुढे काय? वाचा सविस्तर


Next Post
Shoaib-Akhtar-And-Babar-Azam

'सुपरस्टार खेळाडूंची लाईन लावेल...', शोएब अख्तर पीसीबी अध्यक्ष बनण्यासाठी इच्छुक, वाचा सविस्तर

Ravindra-Jadeja

'जडेजाने माझा सल्ला न ऐकून बरे केले', भारतीय दिग्गजाकडून जुन्या घटनेला उजाळा

Photo Courtesy: Twitter/BCCI Womens

टी20 विश्वचषक: आयर्लंडविरुद्ध 'करो वा मरो' सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी, संघात एक बदल

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143