आयपीएलच्या 14 व्या सत्रामध्ये शनिवारी (10 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान तिसरा सामना पार पडला. या सामन्यात मागील वर्षी आयपीएल सत्राला मुकलेल्या चेन्नईचा फलंदाज सुरेश रैनाने आपल्या फलंदाजीने सर्वांना भुवया उंचावण्यास भाग पाडले. तंबूत परतण्यापूर्वी त्याने 36 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या.
सुरेश रैना दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत असताना या सामन्यात एक अँटी-क्लायमॅक्स आला. रवींद्र जडेजा मैदानावर असे काही केले जे दिल्लीच्या गोलंदाजालाही शक्य झाले नसते. त्याने दुसरी धाव घेण्याच्या गोंधळात रैनाला धावबाद केले. यानंतर रैना धावबाद झाल्यानंतर जडेजा युवा गोलंदाज आवेश खानला रागावताना दिसला.
जडेजाने आवेश खानच्या सोळाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण केली आणि त्याने दुसरी धाव घेण्याचा निर्णय घेतला. परंतु गोलंदाज आवेश खान त्याच्या मार्गात आल्याने त्याला धाव पूर्ण करता आली नाही आणि तो परत फिरला. त्यामुळे रैना धावबाद झाला. परंतु यात गोलंदाज आवेश खानचा कोणताही दोष नसताना जडेजा त्याच्यावर चिडल्याचे दिसून आले.
त्याने काही वेळासाठी आवेश खानकडे डोळे मोठे करुन एकटक पाहिले. याबरोबरच हाताने कसला तरी इशाराही केला. परंतु मागे पंच उभा असल्याचे पाहून तो लगेचच शांत बसला.
https://twitter.com/lodulalit001/status/1380916873760436227?s=20
भलेही धाव घेण्याच्या गोंधळात रैना धावबाद झाला. परंतु त्यावेळी नॉन स्ट्राईकवर असलेल्या जडेजाने डावाखेर संघाला 188 धावा उभारण्यात योगदान दिले. त्याने 17 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 26 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-