अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या महिलांच्या इंडियन प्रीमियर लीगला मुहूर्त सापडला आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात ही बहुप्रतिक्षित लीग सुरू होईल. या लीगची अधिकृत घोषणा सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. त्यानंतर आता विविध आयपीएल फ्रॅंचाईजींनी संघ खरेदी करण्यासाठी रस दाखवला आहे. चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स यांनी थेट संघाचे मालकी हक्क मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे बीसीसीआयकडून मागवल्याचे सांगण्यात येते.
माध्यमांमधून मिळत असलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने महिला आयपीएलसाठी निविदा मागवल्या असून, यासाठी कोणतीही आधारभूत किंमत ठरलेली नाही. आधारभूत किंमत ठेवल्यास अनेक संघ यापासून दूर जाऊ शकतात. सध्या तरी पुरुष आयपीएलमधील संघांची संघमालकी असलेल्या संघाने महिला आयपीएलचे संघ खरेदी करण्यासाठी सर्वाधिक रस दाखवला आहे.
चार वेळा पुरुष आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स चे सीईओ काशी विश्वनाथ यांनी बोलताना म्हटले,
“आम्ही महिला आयपीएलमध्ये संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहोत. याबाबतची कागदपत्रे आम्ही मागवली आहेत. आम्हालाही महिला क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचे आहे.”
राजस्थान रॉयल्सने देखील बिडींग डॉक्युमेंट मागवली आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्स हेदेखील महिला आयपीएलमध्ये संघ खरेदी करण्यासाठी आघाडीवर असल्याचे सांगितले जाते.
बीसीसीआय प्रथमच महिला आयपीएल आयोजित करत असली तरी वुमन्स टी20 चॅलेंज ही तीन संघांची स्पर्धा आयोजित करत आली आहे. आयपीएलच्या चार हंगामा दरम्यान ही स्पर्धा खेळली गेली होती. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम व डी.वाय पाटील स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.
(CSK And Rajasthan Royals Intrested In Womens IPL Teams)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकीकडे शिवम मावीने गाजवलं मुंबाईचं वानखडे स्टेडियम अन् दुसरीकडे घरी कुटुंबीय…
टीम इंडियाच्या ‘या’ दोन दिग्गजांना आयडल मानतो जितेश; म्हणाला, “त्यांनी मला…”