दिल्ली कॅपिटल्स संघाने युवा कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्वात इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या आपल्या पहिल्या सामन्यात एमएस धोनीच्या बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सात गडी राखून पराभव केला. सलामी जोडी पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या विस्फोटक अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई संघाने दिलेल्या 189 धावांचे लक्ष्य दिल्लीने सहज पार केले.
या सत्रातील आपला पहिला सामना चेन्नई संघासाठी आणि कर्णधार धोनी या दोघांसाठी वाईट ठरला. कारण प्रथम फलंदाजीकरीता आलेल्या धोनीला भोपळीही न फोडता तंबूत परतावे लागले; तर दुसरीकडे सामना पराभवानंतर आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून त्याला दंड ठोठावण्यात आला.
दिल्लीविरुद्ध झालेल्या या सामन्यात चेन्नईचा कर्णधार धोनी याला षटकांची गती कमी राखल्याने 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. कारण बीसीसीआयने असा नियम बनविला आहे की, आता प्रत्येक संघाने आपली 20 षटके 90 मिनिटांत पूर्ण केली पाहिजेत. यापूर्वी 20 वे षटक हे 90 व्या मिनिटाला सुरु करावे असा नियम होता, परंतु आता दीड तासाच्या आत निर्धारित 20 षटके पूर्ण करावी लागणार आहेत. 90 मिनिटांत दोन्ही संघांना अडीच मिनिटांचा दोनदा टाईम आऊट मिळेल. म्हणजेच संघांना एकूण 85 मिनिटांत 20 षटके टाकावी लागणार आहेत. त्यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये 14.11 षटके पुर्ण करायची आहेत.
याबरोबरच हंगामातील पहिल्याच सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर धोनीने वक्तव्य केले. तो म्हणाला की, “आम्ही खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकलो असतो. परंतु गोलंदाजांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही आणि त्यांनी खूप सैल गोलंदाजी केली. त्यातून त्यांना धडा मिळला आहे आणि भविष्यात ते यामध्ये सुधार करून अधिक चांगली कामगिरी करतील.”
महत्त्वाच्या बातम्या-
DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर
‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ
फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज