चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी (०९ मे) आयपीएल २०२२चा ५५वा सामना खेळला गेला. दिल्लीच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला हा सामना चेन्नईने ९१ धावांच्या फरकाने जिंकला. चेन्नईच्या या मोठ्या विजयानंतर त्यांच्यासाठी प्लेऑफचा मार्ग खुला झाला आहे. परंतु त्यांना त्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल, तसेच इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. आता चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या समीकरणांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीविरुद्धच्या (CSK vs DC) विजयानंतर सीएसकेच्या खात्यात ८ गुणांची नोंद झाली आहे. तसेच त्यांना नेट रन रेटमध्येही फायदा झाला आहे. आणखी सीएसकेला ३ साखळी फेरी सामने खेळायचे असून मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्याशी त्यांना भिडायचे आहे. अशात सीएसकेने हे तिनही सामने जिंकले, तर त्यांचे १४ गुण होतील आणि संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत (CSK Play Off Equations) राहतील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
परंतु जर सीएसकेने उर्वरित सामन्यांपैकी एकही सामना गमावला, तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. कारण सध्या गुणतालिकेत पहिल्या ४ क्रमांकावर असलेल्या संघांच्या खात्यात १६-१६ आणि १४-१४ गुण आहेत.
अशात सामन्यानंतर धोनीला (CSK Captain MS Dhoni) प्लेऑफमध्ये जाण्याच्या समीकरणांबद्दल प्रश्न विचारला गेला. यावर धोनी (MS Dhoni On Play Off Equations) म्हणाला की, “मी गणिताचा फार मोठा चाहता नाही. मी शाळेतही गणित या विषयात कच्चा होतो. सामन्यादरम्यान रन रेटचा विचार केल्याने मदत मिळत नाही. जेव्हा २ अन्य संघ खेळ असतात, तेव्हा तुम्ही दबावात किंवा इतर कोणत्या विचारात गुंतलेले असू नये. तुम्हाला फक्त याचा विचार करायचा असतो की, पुढील सामन्यात काय होईल. जर आम्ही प्लेऑफमध्ये जागा मिळवली, जर अतिउत्तम होईल. परंतु जर आम्ही तसे करण्यात अपयशी झालो, तर जग बुडून जाणार नाही.”
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या सीएसके (Chennai Super Kings) संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत २०८ धावा केल्या आणि दिल्लीपुढे २०९ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाला १७.४ षटकात फक्त ११७ धावाच करता आल्या. परिणामी चेन्नईने हा सामना ९१ धावांनी जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘कर्वे नगरच्या पोरी, जगात भारी’, हटके पोस्टरमुळे सीएसकेचा पुणेकर चाहता आला चर्चेत
ऋतुराजने विरोधी संघाच्या वेगवान गोलंदाजाचे गायले गोडवे; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है’