भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाच्या छोट्या गोंडस मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रैनाचा मुलगा रिओ फलंदाजी करताना दिसतोय. तर स्वतः रैना गोलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रैनाचा मुलगा रिओ खूपच छान दिसतोय. हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण त्यावर लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत. त्याचबरोबर चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सुरेश रैनाचा मुलगा रिओचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका गोष्टीचा सर्वाधिक उल्लेख केला जात आहे. ती गोष्ट म्हणजे रिओ उजव्या हाताने फलंदाजी करतोय. तर सुरेश रैना हा डावखुरा फलंदाज आहे. यावर चाहते मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. तसेच रैना पुन्हा एकदा सीएसकेसाठी खेळू शकतो, असेही चाहते म्हणत आहेत.
Growing up fast with Daddy lion! 🦁#Yellove #WhistlePodu 🦁💛 @ImRaina pic.twitter.com/GqI7xy4reZ
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 31, 2022
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि चेन्नई संघ व्यवस्थापनात मतभेदाची बातमी समोर आली होती. जडेजाने आयपीएल 2022 च्या शेवटचे काही सामनेही खेळले नव्हते. तेव्हापासून जडेजा आणि चेन्नईच्या संघात सर्व काही ठीक नसल्याचे बोलले जात आहे. याशिवाय आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात सुरेश रैनाला चेन्नई संघाने विकत घेतले नव्हते. यानंतर चेन्नई संघाने रैनाच्या मुलाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता पुन्हा एकदा तो संघात समाविष्ट होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
सुरेश रैना हा आयपीएल 2008 ते 2015 या काळात चेन्नईचा उपकर्णधार होता. चेन्नई संघाला निलंबित केल्यानंतर दोन वर्ष गुजरात संघासाठी खेळला. 2018 व 2019 मध्ये त्याने पुन्हा चेन्नईसाठी खेळण्यासाठी खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, 2020 आयपीएल वेळी त्याने वैयक्तिक कारणाने अचानक आयपीएलमधून माघार घेतली होती. मात्र, 2021 मध्ये पुनरागमन करत त्याने संघाला विजेता बनविले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! भारतीय चाहत्याला जीवे मारण्याची धमकी; भारत-पाक सामन्यात केलेली ही कृती
कर्णधार पाकिस्तानी; उपकर्णधार भारतीय! पाहा हाँगकाँगचा प्रत्येक खेळाडू मूळचा कोणत्या देशाचा
‘बाप्पां’च्या भक्तीत तल्लीन झाला डेविड वॉर्नर, खास पोस्टसह जिंकली कोट्यवधी भारतीयांची मने