इंडियन प्रीमियर लीग २०२१च्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्याला आता लवकरच सुरुवात होणार आहे. आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये होणार आहेत. यासाठी आयपीएलचा संघ चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) सर्वात आधी यूएईला रवाना होणाऱ्या संघांपैकी एक आहे. चेन्नईच्या खेळाडूंनी आता क्वारंटाईन कालावधी पूर्ण करुन सरावाला देखील सुरुवात केली आहे. यादरम्यान सीएसकेने एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ज्यामध्ये खेळाडू त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याची मुलगी झीवा सोबत खेळताना दिसत आहे. तर सुरेश रैना देखील आपल्या मुलांसोबत दिसत आहे. तसेच धोनीची पत्नी साक्षी धोनीसुद्धा यात दिसत आहे. एकंदरीत या व्हिडिओमध्ये सीएसकेचे सर्व खेळाडू आपल्या परिवारातील सदस्यांना सोबत चांगला वेळ व्यतीत करताना दिसत आहेत.
यूएईमध्ये पहिल्यांदाच सीएसकेच्या खेळाडूंबरोबर त्यांच्या परिवारातील सदस्य सोबत आहेत. मागील हंगामात सीएसकेचे सर्व खेळाडू आपल्या परिवाराशिवाय यूएईला दाखल झाले होते.
https://www.instagram.com/p/CTKcxQNhr3T/
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यूएईमध्ये करण्याचे ठरवले गेले. यासाठी आता आयपीएलच्या सर्व संघांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. चेन्नईबरोबरच मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघानी देखील यूएईला हजेरी लावली आहे. यातील चेन्नई, मुंबई आणि दिल्लीच्या संघांचे सराव सत्र देखील सुरू झाले आहे.
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.
आतापर्यंत झालेल्या आयपीएल २०२१ मधील सामन्यांमध्ये सर्वाधिक १२ गुणांसह दिल्लीचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. १० गुणांसह चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानावर, तर बेंगलोरचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ८ गुणांसह मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘या’ खेळाडूंनी बाकावर बसून घालवला इंग्लंड दौरा, आगामी सामन्यांमध्येही संधी मिळणे कठीण
–वॉशिंग्टन सुंदरची दुखापत ‘या’ खेळाडूसाठी ठरू शकते वरदान; टी२० विश्वचषकासाठी होऊ शकते निवड
–उंच उडीमध्ये भारताला ‘दुहेरी’ यश! मरियप्पणने पटकावले ‘रौप्य’, तर शरदच्या नावे ‘कांस्य’