इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा (आयपीएल) हंगाम संपून काही दिवसच सरले आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर संघाने (सीएसके) संपूर्ण हंगामात शानदार प्रदर्शन करत हा हंगामाचे जेतेपद पटकावले आहे. मात्र यानंतर आगामी आयपीएल हंगामात धोनी सीएसकेकडून खेळेल की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता शनिवार रोजी (२० नोव्हेंबर) धोनीने आपल्या शेवटच्या टी२० अर्थातच आयपीएल सामन्याविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे. सीएसकेने त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
‘द चँपियस कॉल’ या सीएसकेच्या आयपीएलमधील विजयाच्या जल्लोष साजरा करण्यासाठी आयोजण्यात आलेल्या कार्यक्रमात धोनी बोलत होता. यावेळी बोलताना त्याने आपण आपला शेवटचा टी२० सामना चेन्नई येथे खेळू इच्छित असल्याचे त्याने म्हटले आहे.
सीएसकेचा कर्णधार म्हणाला की, “मी नेहमीच माझ्या क्रिकेटविषयी योजना बनवल्या आहेत. मी मायदेशातील माझा शेवटचा वनडे सामना रांची येथे खेळला होता. त्यामुळे मी अपेक्षा करतो की, माझा शेवटचा टी२० सामना मी चेन्नई येथे खेळेल. मग तो पुढील वर्षी होईल किंवा मग त्यासाठी अजून ५ वर्षांचा अवधी लागेल, याबद्दल मी अजून निश्चितपणे काही सांगू शकत नाही.”
A promise from #Thala…#Anbuden awaiting… 💛🦁#WhistlePodu #Yellove pic.twitter.com/zGKvtRliOY
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 20, 2021
या कार्यक्रमाला तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही उपस्थिती लावली होती. आपल्या व्यस्त वेळेतील वेळ काढत त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. आपल्या उपस्थितीसंदर्भात ते म्हणाले की, “मी येथे फक्त एमएस धोनीचा चाहता म्हणून आलो आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून नाही.”
दरम्यान धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसके संघ आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. सीएसकेने आतापर्यंत आयपीएलमध्ये ४ वेळा चषक पटाकवला आहे. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत त्यांनी चौथ्यांदा चषकावर आपले नाव कोरले आहे. यापूर्वी २०१०, २०११ आणि २०१८ या ३ हंगामात सीएसके संघ विजेता राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा भारतीय चाहत्याशी पंगा; टी२० मालिकेतील पराभवावर म्हणाला, ‘अर्थहीन सिरीज…’