इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 29वा सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा दारुण पराभव केला. शुक्रवारी (दि. 21 एप्रिल) एमए चिदंबरम स्टेडिअमवरील हा सामना चेन्नईने 7 विकेट्सने जिंकला. यासह हंगामातील चौथा विजय साकारला. या विजयाचा शिल्पकार रवींद्र जडेजा ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, या विजयानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने गोलंदाजांची प्रशंसा केली. यावेळी त्याने एक हैराण करणारे विधानही केले. यावरून धोनीने निवृत्तीचे संकेत दिल्याचेही बोलले जात आहे.
धोनीचे मोठे वक्तव्य
सामना विजयानंतर एमएस धोनी (MS Dhoni) म्हणाला की, “हा माझ्या कारकीर्दीतील अखेरचा टप्पा आहे. याचा आनंद घेताना मला खूपच चांगले वाटत आहे. दोन वर्षांनंतर चाहत्यांना मैदानावर येण्याची संधी मिळाली. चाहत्यांनी आम्हाला खूप प्रेम दिले.” गोलंदाजांचे कौतुक करताना तो म्हणाला की, “पथिरानाविरुद्ध धावा करणे कठीण आहे. मी दव पडण्याबाबत खात्री नव्हती. तसेच, पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मी संकटात होतो. एकूणच मधल्या षटकांमध्ये आम्ही चांगला खेळ दाखवला. वेगवान गोलंदाजांनी शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी केली. मी नेहमीच त्यांना म्हणतो की, क्षेत्ररक्षण सेट करण्याची पहिली प्राथमिकता तुमच्याकडे आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “फलंदाजांना जास्त संधी मिळाली नाही, पण मला कोणतीही तक्रार नाही.” यष्टीमागे आपल्या झेलाबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मला सर्वोत्तम झेल पुरस्कार मिळाला नाही, पण मला वाटते की, हा शानदार झेल ठरला. यष्टीमागे हे सोपे काम आहे. मात्र, असे बिल्कुल नाहीये. मला अजूनही एक सामना आठवतो, खूप काळापूर्वी राहुल द्रविड क्षेत्ररक्षण करत होता आणि त्यानेही असाच झेल पकडला होता. निश्चितच मी म्हातारा झालो आहे आणि यापासून दूर होऊ शकत नाही.”
In his own style, @msdhoni describes yet another successful day behind the stumps 👏
And along with it, shares a special Rahul Dravid story and admiration for @sachin_rt 😃#TATAIPL | #CSKvSRH pic.twitter.com/4gL8zU9o9v
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
सामन्याबाबत थोडक्यात
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने 7 विकेट्स गमावत 134 धावा केल्या होत्या. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने 3 विकेट्स गमावत 18.4 षटकात 138 धावा करून पूर्ण केले. चेन्नईच्या या विजयात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांचा सिंहाचा वाटा राहिला. जडेजाने गोलंदाजीत कमाल करत 4 षटकात 22 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. तसेच, कॉनवेने 57 चेंडूत 77 धावांची वादळी खेळी साकारली.
3⃣ crucial wickets and just 22 runs with the ball 🙌🏻@imjadeja receives the Player of the Match award in @ChennaiIPL's 7-wicket win over #SRH 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/0NT6FhLKg8#TATAIPL | #CSKvSRH pic.twitter.com/QtdnmgTQ5q
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम?
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामाच्या सुरुवातीपासूनच असे म्हटले जात आहे की, हा धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. मात्र, याविषयी धोनी आणि संघ व्यवस्थापनाकडून काहीही माहिती आली नाहीये. मात्र, हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर धोनीने केलेल्या वक्तव्यानंतर असे दिसते की, धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. (csk skipper ms dhoni said it is the last phase of my career and i am enjoying)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजा पुढे सनरायझर्सचे लोटांगण! आयपीएल 2023 मध्ये जड्डूचा जलवा कायम
बला’त्कार प्रकरणात जामीनावर सुटलेल्या 22 वर्षीय खेळाडूने रचला इतिहास, राशिदला पछाडत केली ‘अशी’ कामगिरी