महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२१ गुणतालिकेवर पहिल्या दोन क्रमांकात स्थान टिकवून असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. चेन्नईने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव करून संघाने शानदार सुरुवात केली आहे.
आता संघाचा आरसीबी विरूद्ध हा उत्कृष्ट फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न असेल. चेन्नईचे सर्व खेळाडू बुधवारी (२२ सप्टेंबर) सरावासाठी आले, जिथे एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ संघाच्या ट्विटर अकाऊंटवरूनही शेअर करण्यात आला आहे.
न्यूझीलंड आणि चेन्नईचा स्टार फिरकीपटू मिशेल सॅन्टनर नेटमध्ये गोलंदाजी करत होता. त्याचा वेग तपासण्यासाठी सीएसकेचे सर्व खेळाडू तिथे उपस्थित होते. त्याने पहिला वेगवान चेंडू टाकला, ज्याचा वेग १११ किमी प्रतितास होता. त्यानंतर त्याने पुढचा चेंडू टाकला, ते पाहून अंबाती रायुडू आणि ऋतुराज गायकवाड यांनाही धक्का बसला. यावेळी सँटनरने १२६ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला.
त्याचा वेग पाहून चेन्नईच्या अनेक चाहत्यांनी, तर तो फिरकीपटू सोडून वेगवान गोलंदाज बनायला हवा, असे म्हटले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध संघाच्या मागील सामन्यात सॅन्टनरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. त्याच्या जागी संघाने मोईन अली आणि रवींद्र जडेजाला यांना फिरकीपटू म्हणून संधी दिली.
Seama Raja Santner vs The speed gun! ⚡#WhistlePodu #Yellove 🦁💛@MitchellSantner pic.twitter.com/REz929Bikg
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 22, 2021
मात्र, दोन्ही खेळाडूंना छाप पाडण्यात यश आले नाही. मोईनने ३ षटकांत १६ धावा दिल्या, जडेजाने एकाच षटकात १३ धावा दिल्या आणि दोघांना एकही विकेट मिळू शकली नाही.
आता चेन्नईचा सामना बेंगलोरविरुद्ध शुक्रवारी (२४ सप्टेंबर) होणार आहे. सध्या चेन्नईने ८ सामन्यांपैकी ६ सामने जिंकले आहेत. तर, बेंगलोरने ८ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘गब्बर’चा धमाका! आयपीएल २०२१मध्ये ४०० धावा करताच शिखरने ‘या’ यादीत रोहित, विराट, वॉर्नरला पछाडले
न्यूझीलंड, इंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलियाही करणार पाकिस्तान दौरा रद्द? बोर्डाने दिले ‘हे’ उत्तर
पाकिस्तानसाठी न्यूझीलंडचा दौरा पडला महागात, सुरक्षा अधिकाऱ्यांनी खाल्ली २७ लाखांची बिर्याणी