इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चेपॉक येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या. चेन्नईकडून नूर अहमदने चार आणि खलील अहमदने तीन विकेट्स घेतल्या.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. माजी कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने संघाला पहिल्याच षटकात धक्का बसला. रोहित खाते न उघडताच बाद झाला. रायन रिकेल्टनला 7 चेंडूत फक्त 13 धावा करता आल्या. विल जॅक्स 11 धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादव 26 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. रॉबिन मिंजने तीन विकेट्स घेतल्या आणि तिलक वर्मा 31 धावा करून बाद झाला. नमनला फक्त 17 धावा करता आल्या. शेवटी दीपक चहरने फटकेबाजी करत 15 चेंडूत 28 धावा केल्या. आशाप्रकारे संघ सन्मानजनक (155) धावसंख्येपर्यंत पोहोचला.
CHENNAI SUPER KINGS NEEDS 156 RUNS TO WIN THE MATCH vs MUMBAI INDIANS. pic.twitter.com/AQlv4XN95b
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 23, 2025
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
चेन्नई सुपर किंग्ज: रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस, खलील अहमद
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू