आज (23 मार्च) रविवारी चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2025 च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावा केल्या. चेन्नईने 19.1 षटकांत 6 गडी गमावून 158 धावा करून सामना जिंकला.
टाॅस गमावून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या. चेन्नईकडून नूर अहमदने चार आणि खलील अहमदने तीन विकेट्स घेतल्या. 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. राहुल त्रिपाठी दोन धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर 26 चेंडूत 53 धावा करून ऋतुराज गायकवाड बाद झाला. शिवाय शिवम दुबे नऊ धावा करून बाद झाला. दीपक हुडा फक्त तीन धावा करू शकला. शेवटी रचिन रवींद्र नाबाद राहत 65 धावांची निर्णायक खेळी खेळली.
Rach Running the show! 💪🏻⚓
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 23, 2025
5️⃣0️⃣ #CSKvMI #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/5CQo9I6aPw
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. रोहित शर्माच्या रूपाने संघाला पहिल्याच षटकात धक्का बसला. रोहित खाते न उघडताच बाद झाला. रायन रिकेल्टनला 7 चेंडूत फक्त 13 धावा करता आल्या. विल जॅक्स 11 धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादव 26 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. रॉबिन मिंजने तीन विकेट्स घेतल्या आणि तिलक वर्मा 31 धावा करून बाद झाला. शेवटी दीपक चहर 15 चेंडूत 28 धावा करत नाबाद राहिला. चेन्नईकडून नूर अहमदने चार आणि खलील अहमदने तीन विकेट्स घेतल्या.
RACHIN RAVINDRA FINISHES OFF IN STYLE AT THE CHEPAUK. 🦁pic.twitter.com/xVt0gzWhE6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 23, 2025