इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी खास झालेली नाही. त्यातच आता चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अशी बातमी समोर येत आहे की, चेन्नईचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा उर्वरित आयपीएल २०२२ हंगामातून बाहेर पडू शकतो. त्याला बरगड्यांची दुखापत झाली आहे.
जडेजा रविवारी (८ मे) झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याला देखील मुकला होता. त्यावेळीही त्याला याच दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. जडेजाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ४ मे रोजी सामना खेळताना क्षेत्ररक्षणावेळी दुखापत (A Rib Injury) झाली होती. त्यानंतर चेन्नईने त्याच्या दुखापतीवर काम केले होते, पण ही स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली असल्याने आणि चेन्नईचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्याने चेन्नईची संघव्यवस्थापन जडेजाच्या बाबतीत जास्त जोखीम न घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल २०२२ च्या सुरुवातील कर्णधार झाला होता. आयपीएल २०२२ हंगामापूर्वी (IPL 2022) धोनीने (MS Dhoni) चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा जडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवली होती. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तसेच जडेजाची वैयक्तिक कामगिरीही खालावली. त्यामुळे जडेजाने पहिल्या ८ सामन्यात नेतृत्व केल्यानंतर वैयक्तिक कामगिरीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धोनी पुन्हा कर्णधार झाला.
जडेजाची निराशाजनक कामगिरी
जडेजासाठी आयपीएल २०२२ हंगाम विसण्यासारखा राहिला. कारण चेन्नई संघ त्याच्या नेतृत्वाखाली ८ पैकी केवळ २ सामने जिंकू शकले. तसेच त्याची वैयक्तिक कामगिरीही फारशी बरी झाली नाही. त्याने आयपीएल २०२२ मध्ये १० सामने खेळले असून ११६ धावा केल्या आहेत. तसेच ५ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘काहीतरी मोठे होणार आहे’, रोहित शर्माबद्दल भारताच्या दिग्गज अष्टपैलूची खास भविष्यवाणी
आयपीएल २०२२ ला लागणार समारोप समारंभाचा तडका, ‘या’ सेलिब्रेटिंचा परफॉर्मन्स होण्याची शक्यता
धक्कादायक! मुंबईतील धावपटू जवळपास महिन्याभरापासून बेपत्ता, ‘हे’ गंभीर कारण असण्याची शक्यता