ऑस्ट्रेलिया संघाचा धुरंधर ग्लेन मॅक्सवेल याने मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39व्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध कमाल फलंदाजी केली होती. त्याने आव्हानाचा पाठलाग करताना नाबाद 201 धावांची खेळी केली होती. या खेळीला वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी म्हटले गेले. आव्हानाचा पाठलाग करताना कुठल्याच खेळाडूने असा पराक्रम केला नव्हता. या खेळीनंतर मॅक्सवेलवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. अनेकांनी त्याचे गोडवे गायले. यात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचाही समावेश होता, पण त्याने या खेळीला वनडेतील महान खेळी मानन्यास नकार दिला.
मॅक्सवेलची खेळी
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) 128 चेंडूंचा सामना करताना 10 षटकार आणि 21 चौकारांच्या मदतीने नाबाद 201 धावा केल्या होत्या. या खेळीची खासियत म्हणजे, त्याला यादरम्यान क्रॅम्प आणि वेदना होत होत्या, पण तरीही तो शेवटपर्यंत टिकून राहिला आणि संघाला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला. अशात कोलकाता येथे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या ट्रेनिंग कँपनंतर पत्रकारांशी बोलताना सौरव गांगुली याने मॅक्सवेलच्या खेळीविषयी (Sourav Ganguly On Maxwells Inning) प्रतिक्रिया दिली.
गांगुलीचे विधान
मॅक्सवेलच्या खेळीविषयी बोलताना गांगुली म्हणाला की, “नाही नाही. मी या खेळीला वनडे क्रिकेट प्रकारातील महान खेळी मानत नाही. मी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या अनेक शानदार खेळी पाहिल्या आहेत. मी काही शानदार खेळी पाहिल्या आहेत. मॅक्सवेलची खेळी यासाठी खास आहे, कारण त्याची स्थिती वेगळी होती. तो क्रॅम्प्सचा सामना करत होता. धावू शकत नव्हता. तो तळातील फलंदाजासोबत क्रीजवर टिकून खेळत होता. तो षटकार मारत होता. मात्र, सचिन आणि विराटने अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत.”
दक्षिण आफ्रिकेशी सामना
खरं तर, ऑस्ट्रेलिया संघाने अफगाणिस्तानला मात देऊन उफांत्य फेरीचे तिकीट मिळवले होते. ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडेल. कारण, विश्वचषक 2023 स्पर्धेच्या नियमानुसार, पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल असणारा संघ टेबलमधील चौथ्या क्रमांच्या संघाशी पहिला उपांत्य सामना खेळेल. तसेच, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांमध्ये स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना होईल. आता पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी वानखेडेत आणि दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकातामध्ये होणार आहे. (cwc 2023 sourav ganguly does not rate glenn maxwell 201 innings against afghanistan as greatest odi knock says this)
हेही वाचा-
दिनेश कार्तिकच्या खांद्यावर पुन्हा कर्णधारपदाची धुरा, ‘या’ संघाचं करणार नेतृत्व
‘प्रामाणिकपणे सांगतो, मला फरक पडत नाही…’, ICC वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 बनूनही असे का म्हणाला भारतीय धुरंधर?