---Advertisement---

BREAKING: बिगरमानांकित वोंड्रासोव्हा बनली विंबल्डनची नवी सम्राज्ञी! जेब्युर उपविजेती

---Advertisement---

टेनिस विश्वातील चार मानाचा ग्रँडस्लॅमपैकी तिसरी स्पर्धा असलेल्या विंबल्डन स्पर्धेचा महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवारी (15 जुलै) खेळला गेला. चेक रिपब्लिकची बिगरमानांकित मार्केटा वोंड्रासोव्हा हिने अंतिम सामन्यात ट्युनिशियाच्या ओन्स जेब्युरला 6-4,6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत आपले पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. ओपन एरामध्ये एकेरीची स्पर्धा जिंकणारी ती पहिली बिगर मानांकित खेळाडू ठरली.

प्रथमच कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत असलेल्या या दोन्ही खेळाडूंमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. मार्केटा वोंड्रासोव्हा हिने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवताना सातत्याने गुण घेतले. जेब्युरने तिला चांगली लढत दिली. मात्र, वर्चस्व गाजवण्यात ती अपयशी ठरली. अखेर मार्केटाने 6-4,6-4 असा विजय संपादन करत स्पर्धा आपल्या नावे केली.

(Czech Republic Marketa Vondrousova Won Wimbledon 2023 Womens Singles)

महत्वाच्या बातम्या –
‘या’ खेळाडूला शक्य तिथे संधी द्याच! अनिल कुंबळेंचा भारतीय संघाला मोलाचा सल्ला
टीम इंडियाचा कर्णधार बनताच आली ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “गळ्यात सुवर्णपदक घालून…”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---