नुकतेच मंगळवारी (३१ ऑगस्ट) दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर स्टेनने भारतातील आपल्या खेळाच्या आठवणींना उजाळा देत आपले अनुभव सांगितले. स्टेनच्या मते भारतात त्याला एखाद्या चित्रपटातील कलाकारासारखे वागवले जायचे. स्टेन भारतातील इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) देखील खूप खेळला आहे.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत स्टेनने सांगितले की, “भारत एक अद्भुत ठिकाण आहे. इथे आपल्याला एखाद्या सिताऱ्यासारखे वागवले जाते. तुमच्या सोबत हॉलिवूड किंवा बॉलीवूडच्या कलाकाराप्रमाणे व्यवहार केले जातात. तिथले लोक क्रिकेटवर खूप प्रेम करतात. तुम्ही विमानतळावर जा अथवा सराव करत असा १०,००० लोक तुम्हाला पाहतच असतात. आता हे सगळे मी पुन्हा माझ्या आयुष्यात अनुभवू शकेल की नाही? हे माहीत नाही.”
सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉंटिंग यांच्या खेळीचे देखील केले कौतुक
स्टेनने सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉंटिंग यांच्या फलंदाजीचे कौतुक केले. त्याच्या मते सचिन आणि पॉंटिंग दोघेही अप्रतिम फलंदाज होते. तो म्हणाला, “ते आपल्या रणनीतीला आधीच ओळखून त्यानुसार चांगली खेळी करायचे. ज्यामुळे ते त्यांची विकेट वाचवून खेळण्यात यशस्वी व्हायचे.”
स्टेन आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळले आहे. त्याने शेवटी आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून खेळली होती. स्टेनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत एकूण ९३ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ४३९ विकेट्स घेतल्या होत्या. तर १२५ एकदिवसीय सामन्यात १९६ विकेट्स घेतल्या होत्या आणि ४७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ६४ विकेट्स घेतल्या होत्या. स्टेनने २०१९ मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
स्टेनने २००५ साली दक्षिण आफ्रिकेच्या सेंचुरियन मैदानात आफ्रिका इलेव्हनकडून खेळताना एशिया इलेव्हनविरुद्ध आपले एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. त्यानंतर एकदिवसीय कारकिर्दीत स्टेनची ३९ धावा देऊन ६ विकेट्स ही सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली. जीत्याने २०१३ साली पाकिस्तान विरुद्ध खेळली होती. त्या मालिकेत स्टेनने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांना खूप अडचणीत आणले होते.
२००७ मध्ये स्टेनने न्यूझीलंड विरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून पदार्पण केले होते. स्टेनने त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना २०१९ मध्ये श्रीलंका विरुद्ध खेळला होता. तर आपला शेवटचा टी-२० सामना त्याने २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यात खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
–अष्टपैलू जडेजा पूर्णपणे फिट, मग अश्विन परत बाकावर? गोलंदाजी प्रशिक्षकांनी दिली प्रतिक्रिया
–कुंबळे-द्रविडच्या मार्गदर्शनाखाली ‘या’ ३ भारतीय क्रिकेटर्सच्या खेळाचा उंचावला स्तर, एकटा आहे त्रिशतकवीर
–रिषभ पलटवार करण्यास सज्ज, इंग्लंडच्या गोलंदाजांचे सगळे नुसके फेल ठरवण्यासाठी मिळालाय ‘हा’ कानमंत्र