भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, शिवम दुबे गेल्या काही सामन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरला आहे. शिवमला भारतीय संघात देखील गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. आता त्याची आयपीएलमधील फ्लॉप कामगिरी पाहता न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार डॅनियल विटोरीने त्याच्यावर भाष्य केले आहे.
क्रिकइन्फोला दिलेल्या एका मुलाखतीत विटोरीने म्हटले की, “भारतीय संघाचा गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू असल्याने तो (शिवम) खूप सर्वांना खूप आकर्षित करतो. पण मला वाटते की, जेव्हा तुमच्यावर एक भारतीय अष्टपैलू खेळाडू असण्याचा ठप्पा लागतो. तेव्हा तुमच्याकडून अपेक्षा वाढतात. आयपीएल लिलावात देखील तुम्हाला चांगली रक्कम मोजून संघात स्थान दिले जाते.
राजस्थान रॉयल्सने शिवमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघापेक्षा जास्त बोली लावून संघात स्थान नाही दिले. पण तरी ती किंमत जास्तच आहे. परंतु माझे म्हणणे आहे की, तो दोन्ही विभागात खूप वाईट कामगिरी करत आहे. शिवमने राजस्थान संघाला अडचणीत टाकले होते की, त्याला नक्की कुठल्या क्रमांकावर खेळावावं? त्याला ७ व्या क्रमांकांवर हिटर म्हणून वापरण्यात यावं की, विजय शंकर स्टाईलमध्ये गोलंदाज म्हणून वापरण्यात यावं? हा प्रश्न उपस्थित झाला होता.” असे त्याने पुढे सांगितले.
तसेच विटोरी पुढे म्हणाला की, “तरीही आम्ही त्याला वेगवेगळ्या भूमिकेत उतरवून त्याला अष्टपैलू म्हणून यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु तो फलंदाजी किंवा गोलंदाजी यापैकी एकाही विभागात स्वतला सिद्ध करु शकला नाही. मग अष्टपैलू म्हणून तो राजस्थानच्या अपेक्षांवर खरा उतरलेला नाही. मला नाही वाटत की तो यापुर्वीही ज्या संघाकडून खेळला आहे, त्या संघात त्याने तो स्तर गाठला असावा. त्याच्याकडून सध्या राजस्थान संघाला खूप आशा आहेत. पण तो कुठल्याही क्षेत्रात योग्य स्तरावर नाही.
शिवमने आतापर्यंत एकूण १८ आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने २११ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याला ४ गडी बाद करण्यात यश आहे. यंदा तो राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईच्या हातून राजस्थान चारीमुंड्या चित; कर्णधार संजू म्हणाला, “आम्हाला अपेक्षा नव्हती की…”
मराठमोळ्या ऋतुराजचा पुन्हा फ्लॉप शो, ‘या’ भारतीय शिलेदाराला संधी देण्याच्या मागणीने धरला जोर
चेन्नईचा राजस्थानवर ‘सुपर विजय’; दिल्ली-मुंबईला पछाडत धोनीच्या पलटणचा गुणतालिकेत ‘या’ स्थानावर ताबा