Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराटच्या षटकारावर इंग्लंडची महिला खेळाडूही फिदा, जे काही म्हणाली त्याने कोहलीही होईल खुश

November 2, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli-And-Danielle-Wytt

Photo Courtesy: Instagram/ICC & danniwyatt28


भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या भलत्याच फॉर्मात आहे. विराट टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत अर्धशतकांचा पाऊस पाडण्याचे काम करत आहे. त्याने बुधवारी (दि. 02 नोव्हेंबर) ऍडलेड येथे खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकाच्या 35व्या सामन्यात जबरदस्त नाबाद अर्धशतक झळकावले आणि एक असा काही उत्तंगु षटकार खेचला, ज्याचा व्हिडिओ स्वत: आयसीसीने त्यांच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओवर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट हिनेदेखील लक्षवेधी कमेंट केली. सध्या याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत विराट कोहली (Virat Kohli) याने 19 वे षटक टाकणाऱ्या हसन महमूद (Hasan Mahmud) याच्या शेवटच्या चेंडूवर अफलातून षटकार खेचला. हा चेंडू थेट लाँग ऑनच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे गेला. हा षटकार पाहून प्रेक्षकांचा उत्साह सातव्या अवकाशात होता.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

या व्हिडिओवर डॅनियल वॅट (Danielle Wyatt) हिने कमेंट करत “बूम” असे लिहिले. यामुळे तिलाही विराटचा हा षटकार खूपच आवडल्याचे दिसते. विराटने या सामन्यात 44 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकार मारत नाबाद 64 धावांची तडाखेबंद खेळी केली.

Danielle-Wytt
Photo Courtesy: Instagram/ICC

विशेष म्हणजे, विराटच्या या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या डॅनियलने 4 एप्रिल, 2014 रोजी मध्यरात्री अनेक ट्वीट करत विराटबद्दल प्रेम व्यक्त केले होते. यावेळी तिने ट्वीटमध्ये विराटचे नाव चुकीचे लिहिले होते. त्यानंतर विराटने तिची भेट घेतल्यानंतर तिला एक बॅट भेट म्हणून दिली होती. डॅनियल नेहमीच अर्जुन तेंडुलकर याच्याबद्दल ट्वीट करत असते.

दुसरीकडे, बांगलादेशविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारताकडून या सामन्यात विराट कोहली याने सर्वाधिक 64 धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त केएल राहुल (50) आणि सूर्यकुमार यादव (30) यांनीही महत्त्वाची खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली.

शेवटच्या षटकात शोरीफूल इस्लामच्या गोलंदाजीवर आर अश्विन आणि विराट कोहली यांनी एक चौकार आणि एक षटकार मारत 14 धावा खेचल्या. तसेच, भारताला 6 विकेट्स गमावत 184 धावा चोपण्यात यश आले. यावेळी बांगलादशकडून गोलंदाजी करताना हसन महमूद याने 3 आणि शाकिब अल हसन याने 2 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. डकवर्थ लुईसच्या नियमानंतर आव्हान 151 धावा करूनही बांगलादेश संघाला 6 विकेट्स गमावत फक्त 145 धावा करता आल्या. त्यामुळे हा सामना भारताने 5 धावांनी खिशात घातला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशला कमी फरकाने धूळ चारण्यात भारत आहे ‘मास्टर’, 2016मध्येही केलीय खास कामगिरी
बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने जिंकल्यानंतर पाकिस्तानला दणका! वाचा नक्की कसे झाले नुकसान


Next Post
Photo Courtesy: Twitter/CricketMAN2

बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी विराटने काय दिलेला कानमंत्र? स्वतः राहुलने केला खुलासा

Raghu

हातात ब्रश घेऊन मैदानावर फिरणारा 'तो' व्यक्ती आहे तरी कोण? भारताच्या विजयात उचललाय मोलाचा वाटा

Photo Courtesy; Twitter/Mumbai Indians

सूर्याच्या एका इशाऱ्याने ऍडलेडमध्ये घुमला 'इंडिया..इंडिया..' आवाज; पाहा जोशपूर्ण व्हिडिओ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143