यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतात भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघात मोठा बदल करण्यात आला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये १७ नोव्हेंबर पासून टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर २ कसोटी सामन्यांची मालिका देखील पार पडणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त असलेल्या डेवोन कॉनवेच्या जागी डॅरील मिशेलला न्यूझीलंड संघात स्थान देण्यात आले आहे. डेवोन कॉनवे टी-२० विश्वचषक स्पर्धेत फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे तो टी-२० विश्वचषक अंतिम सामना आणि भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून बाहेर झाला आहे.
न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी म्हटले की, “डेविड कॉनवे भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेनंतर टी-२० संघासह मायदेशी जाईल. तर डॅरील मिशेल न्यूझीलंड संघासह कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल.”
डॅरील मिशेलने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत देखील अप्रतिम कामगिरी केली आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी डॅरील मिशेलने अप्रतिम फलंदाजी करत न्यूझीलंड संघाला सामना जिंकून दिला होता.
डॅरील मिशेलची कारकीर्द
न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू डॅरील मिशेल याने आपल्या कारकीर्दीत एकूण ५ कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या ५ सामन्यांमध्ये त्याने २३२ धावा चोपल्या आहेत. तर नाबाद १०२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत एकमात्र शतक झळकावले आहे. तर टी२० क्रिकेटमध्ये त्याने २१ सामने खेळताना ३४५ धावा केल्या आहेत.
अशात न्यूझीलंडच्या या अष्टपैलूपुढे भारतीय खेळाडूंचा किती कस लागतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिलेवहिले टी२० विश्वचषक जेतेपद जिंकण्यासाठी विल्यम्सनने कसली कंबर, बनवली ‘ही’ जबरदस्त रणनिती
“आपण टी२० क्रिकेटमध्ये इतरांच्या तुलनेत खूप मागे”; भारतीय खेळाडूचा टीम इंडियाला घरचा आहेर
आपल्या प्रशिक्षणाविषयी भरत अरुण यांचे ‘ते’ विधान चर्चेत