ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाजी डेव्हिड वॉर्नरने बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सिलहेट सिक्सर्सकडून खेळताना धडाकेबाज फलंदाजी केली आहे. मात्र दुखापतीमुळे त्याला अर्ध्यातच ही लीग सोडून ऑस्ट्रेलियाला परतावे लागले आहे.
या लीगमध्ये हाताच्या कोपऱ्याचा त्रास होत असताना सुद्धा वॉर्नर दोन सामने खेळला होता. पण आता या दुखापतीमुळे तो उद्या (22 जानेवारी) मेलबर्नमध्ये त्याच्यावर उपचार घेणार असून शस्त्रक्रियाही करणार आहे.
काही दिवसांपूर्वीच वॉर्नरचा संघसहकारी स्टिव्ह स्मिथला देखील हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. स्मिथनेही त्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया केली असून त्याला सहा आठवड्याची विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे.
वॉर्नरने रंगपूर रायडर्स विरुद्ध दोन्ही हातांनी फलंदाजी करत नाबाद 61 धावा केल्या होत्या. तर नंतरच्या दोन सामन्यात अनुक्रमे 63 आणि 19 धावा केल्या आहेत.
चेंडू छेडछाड प्रकरणामुळे एक वर्षाच्या बंदीची शिक्षा भोगणारे वॉर्नर आणि स्मिथ लीग क्रिकेटमध्ये खेळत होते. पण आता दोघेही दुखापतीमुळे घरी परतले असून येत्या 28 मार्चला त्यांची शिक्षा संपणार आहे. कदाचित ते दुबई येथे होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या वन-डे मालिकेत खेळू शकतील.
महत्त्वाच्या बातम्या-
–होय! धोनीसारखा फिनीशर अजून जन्मला नाही, दिग्गज खेळाडूने केले कौतूक
–तब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक
–मरणासोबत लढत आहे हा माजी भारतीय क्रिकेटर, उपचारासाठीही नाहीत पैसे