ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू डेविड वॉर्नर याला त्याच्या मैदानावरील फटकेबाजीव्यतिरिक्त दाक्षिणात्य सिनेमांवर भन्नाट रील्स बनवण्यासाठीही ओळखले जाते. तो नेहमी दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध झालेले गाणे, एखादा डायलॉग घेऊन रील बनवत असतो. नुकताच प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता यश याचा केजीएफ- चॅप्टर २ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. याच सिनेमातील यशच्या वॉइलन्स, वॉइलन्स, वॉइलन्स या प्रसिद्ध डायलॉगवर वॉर्नरने क्रिकेट शैलीत भन्नाट व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओत दिसते की, वॉर्नर (David Warner) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या जर्सीमध्ये नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करतो आहे. त्याने आपल्या या सरावाच्या व्हिडिओमध्ये ‘केजीएफ- चॅप्टर २’मधील (KGF- Chapter 2) डायलॉग जोडला आणि या दोन्हींच्या कॉम्बिनेशनने छानसा व्हिडिओ तयार केला आहे. तो व्हिडिओत म्हणतो आहे की, ‘वॉइलन्स, वॉइलन्स, वॉइलन्स… आय डोन्ट लाईक इट. आय अवॉइड. बट, वॉइलन्स लाईक्स मी. आय कान्ट अवॉइड.’
थोडक्यात सांगायचे झाल्यास, या डायलॉगद्वारे वॉर्नरचे त्याचे स्वत:चे रूपही दाखवले आहे. वॉर्नरही क्रिकेटपटू म्हणून मैदानात नेहमी आक्रमक अंदाजात दिसला आहे.
https://www.instagram.com/reel/CcXuz4SFmsu/?utm_source=ig_web_copy_link
डेविड वॉर्नरचे दुसऱ्याच सामन्यात अर्धशतक
दरम्यान वॉर्नरच्या आयपीएल २०२२मधील प्रदर्शनाबाबत बोलायचे झाल्यास, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकला आहे. परंतु लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यातून त्याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. तो यंदा दिल्ली संघाचा भाग आहे. दिल्लीकडून आतापर्यंत २ सामने खेळताना त्याने एका अर्धशतकासह ६५ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्याच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या ६१ धावांच्या खेळीचा समावेश आहे.
दिल्ली कॅपिटल्सची या हंगामातील कामगिरी
दरम्यान दिल्ली संघाच्या आयपीएल २०२२मधील प्रदर्शनाबाबत बोलायचे झाल्यास, दिल्लीला त्यांच्या ४ पैकी केवळ २ सामने जिंकता आले आहेत, तर त्यांनी २ सामने गमावले आहेत. हा संघ ४ गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्यांचा पुढील सामना शनिवारी (१६ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध होणार आहे. हा दिल्लीचा हंगामातील पाचवा तर बेंगलोरचा सहावा सामना असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
SRH vs KKR: हैदराबादचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, कोलकातामध्ये धुरंधर खेळाडूंची एन्ट्री
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने मुंबई इंडियन्सच्या मर्मावर ठेवले बोट! म्हणाला, ‘इशान १५.२५ कोटींना पात्र नाही’