आयपीएल २०२२च्या ३४व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघ आमने सामने होते. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. दरम्यान दिल्लीचा धाकड सलामीवीर डेविड वॉर्नर याने त्याचा सलामी जोडीदार पृथ्वी शॉ याचे कौतुक केले आहे. शॉच्या ताबडतोब फलंदाजीमुळे त्याला धावत एक-दोन धावा काढण्याची गरज पडत नाहीय, असे वॉर्नर म्हणाला आहे.
वॉर्नर (David Warner) आणि शॉ (Prithvi Shaw), ही सलामी जोडी दिल्लीकडून (Delhi Capitals Opening Pair) धुमाकूळ घालत आहे. त्यांनी मागील पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची शानदार भागिदारी रचली होती. त्यांच्या या मजबूत भागीदारीमुळे दिल्लीने पंजाबविरुद्धचा सामना एकहाती जिंकला होता. अगदी ११व्या षटकातच दिल्लीने या सामन्यात बाजी मारली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आपल्या नवा सलामी जोडीदार शॉचे कौतुक (David Warner Praises Prithvi Shaw) करताना स्टार स्पोर्ट्सवर वॉर्नर म्हणाला की, “मला शॉसोबत डावाची सुरुवात करायला फार मजा येत आहे. त्याचा हात खूप वेगाने चालतो आणि तो त्याच्या डोळ्यांनीच विरोधी संघाला दबावात आणण्याची ताकद राखतो. तो सातत्याने चौकार किंवा षटकार मारत असतो, ज्यामुळे वेगाने धावत २ धावा घेण्याची माझी मेहनत कमी झाली आहे. पण इतके चांगले आहे की, मला पळून जास्त धावा करण्याची गरज पडत नाहीय. तो पहिल्या चेंडूपासूनच आमच्यासाठी लय बनवून देतो.”
“सहसा असे फार कमीवेळा पाहायला मिळते की, खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना आक्रमक फलंदाज उभे असतात. आम्ही नेहमी मैदानावर उतरताना डोक्यात ठरवून येतो की, आम्हाला सामन्यात सकारात्मक राहायचे आहे आणि पूर्ण क्षमतेने खेळायचे आहे,” असेही पुढे वॉर्नरने म्हटले आहे.
दरम्यान वॉर्नर आणि शॉ जोडीच्या आयपीएलमधील प्रदर्शनाबाबत बोलायचे झाल्यास, त्यांनी चालू हंगामात खोऱ्याने धावा ओढल्या आहेत. शॉने ७ सामने खेळताना ३६.१६च्या सरासरीने २१७ धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये व्यस्त असल्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकलेल्या वॉर्नरने आतापर्यंत ५ सामने ६३.६६ च्या प्रशंसनीय सरासरीने १९१ धावा फटकावल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-