आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा, विराट कोहली, केन विलियमसन आणि डेविड वॉर्नर हे असे खेळाडू आहेत, ज्यांनी क्षेत्ररक्षणाचे स्वरुपच बदलून टाकले आहे. बरेचसे खेळाडू एकमेकांच्या क्षेत्ररक्षण पद्धतीचा अवलंब करतानाही दिसतात. असाच काहीसा प्रकार, नुकत्याच सुरू असलेल्या भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील पाहायला मिळाला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार विलियमसन हवेत उडून चेंडू अडवताना दिसून आला आहे. यावेळी तो हूबेहूब ऑस्ट्रेलियाचा फलंदाज वॉर्नरसारखे क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. दोन्हीही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अशातच ऑस्ट्रेलियन संघाचा आक्रमक फलंदाज वॉर्नर याने आपला आयपीएल स्पर्धेतील एक जुना फोटो आणि विलियमसनचा क्षेत्ररक्षण करत असतानाचा फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे दोघेही एकसारखेच क्षेत्ररक्षण करताना दिसून येत आहेत. हे दोघेही आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतात.
वॉर्नरने हा फोटो शेअर करत चाहत्यांना कॅप्शन सुचवण्यास सांगितले आहे. अनेकांनी या फोटोवर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “केनने तुमची नक्कल केली आहे.” तर अनेकांनी विलियमसनने केलेल्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले आहे. तसेच ५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे.
https://www.instagram.com/p/CQVV4ddLQqu/?utm_medium=copy_link
वॉर्नर आणि विलियमसन हे आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघातील सहकारी आहेत. आयपीएल २०२१ मधील सुरुवातीच्या काही सामन्यांतील खराब कामगिरीनंतर वॉर्नरला नेतृत्त्वपदावरुन हटवण्यात आले. त्याच्याजागी विलियमसनच्या हातात संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली आहेत. (David Warner shares kane Williamson fielding collage and ask fans for intresting caption)
भारतीय संघाला २१७ धावा करण्यात आले यश
दरम्यान कसोटी अजिंक्यपद सामन्यात भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ६२ धावांची भागीदारी केली होती. यामध्ये रोहित शर्माने ३४ धावांचे योगदान दिले तर शुबमन गिल २८ धावा करत माघारी परतला होता. या डावात उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले होते. भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावा करण्यात यश आले.
न्यूझीलंड संघ मजबूत स्थितीत
डेवोन कॉनवे आणि टॉम लेथम यांनी या सामन्यात देखील न्यूझीलंड संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून ३० षटक फलंदाजी केली. त्यानंतर लेथम ३० धावा करत माघारी परतला. तर चांगल्याच फॉर्ममध्ये असलेल्या डेवोन कॉनवेने या सामन्यात देखील अर्धशतक झळकावले. परंतु त्याला मोठी खेळण्यास अपयश आले. तो ५४ धावा करत माघारी परतला. तसेच न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन नाबाद १२ धावांवर फलंदाजी करत आहे. तर रॉस टेलर नाबाद ० धावांवर फलंदाजी करत आहे. तिसऱ्या दिवस अखेर न्यूझीलंड संघाला २ बाद १०१ धावा करण्यात यश आले आहे.
महत्वाच्या बातम्या
चित्याहूनहीअवघ्या २२ धावांवर अष्टपैलू अश्विन तंबूत, पत्नीने चकित होत दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
जास्त चपळ! हवेत उडी मारत अगदी क्षणभरात कोहलीने पकडला एकहाती कॅच
ऐतिहासिक सामन्यात फ्लॉप ठरलेल्या पुजाराला अनुभवी गोलंदाजाचा सल्ला, करायला सांगितले ‘हे’ काम