पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ११५ धावांनी पराभूत करत मालिका १-० ने जिंकली. लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटीच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानपुढे विजयासाठी ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, संघ २३५ धावांवरच सर्वबाद झाला. यापुर्वी रावळपिंडी आणि कराची येथे झालेल्या दोन्ही कसोटी अनिर्णीत राहिल्या. तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा हसन अली बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाजी डेविड वाॅर्नर आपल्या सहकाऱ्यांसोबत आनंद साजरा करताना दिसला. त्याचा या दरम्यानचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली (Hasan Ali) बाद झाल्यानंतर वाॅर्नर (David Warner) अनोख्या पद्धतीने आनंद साजरा करताना दिसला. कसोटीच्या पाचव्या दिवशी १७ चेंडूत १३ धावा केल्यानंतर हसन अलीला नॅथन लायनने बाद केले. यावेळी वाॅर्नर सिली पाॅइंटवर क्षेत्ररक्षण करत होता. जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू या विकेटचा आनंद साजरा करत होते, तेव्हा वाॅर्नरने हसन अलीच्या समोर उभे राहून आनंद साजरा केला. त्यानंतर तो ड्रेसिंग रुममध्ये त्याची नक्कल करताना दिसला. त्याचा हा विनोदी व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Rahulc7official/status/1507317880253480966?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1507317880253480966%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Fwatch-video-david-warner-celebrate-hasan-ali-wicket-in-his-style%2Farticleshow%2F90444376.cms
The boys get together for a chat after the game! #PAKvAUS pic.twitter.com/KUHKRytb5i
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 25, 2022
हसन अलीची ही पाकिस्तानच्या डावातील ८ वी विकेट होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा विजयही निश्चित झाला. कर्णधार पॅट कमिन्सने नसीम शाहला बाद केले आणि संघाला सामन्यात आणि मालिकेत विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलिया संघासाठी दुसऱ्या डावात नॅथन लायनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. कर्णधार पॅट कमिन्सने ३ तर मिशेल स्टार्क आणि कॅमरॉन ग्रीनने १-१ विकेट्स घेतल्या.
कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपल्या दूसरा डाव ३ विकेट्स गमावत २२७ धावा करत डाव घोषित केला होता. स्टीव स्मिथने पहिल्या डावात ५९ धावा केल्या. सलामी फलंदाज उस्मान ख्वाजाने १०४ धावा केल्या. तो मालिकेच्या पहिल्या डावात ९१ धावा करुन बाद झाला. त्याला मालिकावीर म्हणून घोषित केले. आता पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये वनडे आणि टी२० मालिका खेळल्या जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जॉब डन’ म्हणत जेव्हा धोनीने २०२१मध्येच दिले होते सीएसकेचे नेतृत्त्व सोडण्याचे संकेत, पाहा Video
IPL2022| चेन्नई वि. कोलकाता सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
असा क्रिकेटपटू ज्याने, आठ वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर सिनेसृष्टीत आजमवले नशीब; धोनीवरही केले होते आरोप