ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर केवळ फलंदाजीसाठीच नव्हे तर कुटुंबासमवेत मजा करण्यासाठी देखील ओळखला जातो. वॉर्नर अनेकदा आपल्या कुटूंबासह नृत्य आणि विनोद करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. अलीकडेच वॉर्नरची पत्नी कँडिसने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक रहस्ये उघड केली आहेत.
वॉर्नरची पत्नी कँडिसने नुकतीच एका रेडिओ कार्यक्रमात मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान ती आपल्या आयुष्याविषयी मोकळेपणाने बोलली. या मुलाखतीत तिने वॉर्नरसोबतच्या खाजगी जीवनावरही बरेच काही सांगितले आहे. क्रिकेटमधील खेळाडू मोठ्या सामन्यांपूर्वी लैंगिक संबंध टाळतात काय? या प्रश्नाचे उत्तर देताना कँडिस म्हणाली की ते त्या व्यक्तीवर अवलंबून असते.
या मुलाखतीदरम्यान कँडिसने तिच्या पतीची प्रशंसा केली आणि सांगितले की डेव्हिड वॉर्नर या बाबतीत खूप चांगले आहेत. तो खेळाच्या दिवशी माझ्याबरोबर त्याला हवं ते करु शकतो. माझी काही हरकत नाही.
डेव्हिड वॉर्नर आणि कँडिस गेली पाच वर्षे एकमेकांसोबत राहत आहेत. वॉर्नर आणि कँडिस यांनी एप्रिल 2015 मध्ये लग्न केले आणि त्यांना सध्या तीन मुली असून आपल्या कुटूंबात ते खूप आनंदी आहेत. कँडिस वॉर्नरचा सामना पाहण्यासाठी भारतात देखील येते आणि आयपीएल सामन्या दरम्यान ती हैदराबादला चिअर्स करतानाही दिसते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या कसोटीत ‘हा’ खेळाडू वॉर्नरसह येणार सलामीला? ऑस्ट्रेलियन कर्णधाराने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरणार अनवाणी पायांनी; कारण आहे खूपच कौतुकास्पद
ट्रेंडिंग लेख –
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…