डेविड विसे याच्या ताबडतोड अर्धशतकीय खेळीनंतर देखील गुरुवारी नामिबियाला यूएईकडून पराभव स्वीकारावा लागला. आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतील ‘ग्रुप ए’ मधील हा सामना होता. यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि नंतर गोलंदाजी करताना विजय देखील मिळवला. नामिबिया या पराभवानंतर विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. डेविड विसेने संघाला विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, पण शेवटी त्याला निराशाच मिळाली. सामना संपल्यानंतर विसेला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रथम फलंदाजी करतान यूएईने 3 विकेट्सच्या नुकसानावर 148 धावा केल्या. या धावा करण्यासाठी सलामीवीर मुहम्मद वसीम (50) आणि सीपी रिजवान (43*) यांनी सर्वात मोठी खेळी केली. 149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबिया संघ मर्यादित 20 षटकांमध्ये 141 धावांपर्यंत मजल मारू शकला. नामिबियासाठी हा सामना करा किंवा मरा होता आणि त्यांच्या खेळाडूंनी तसे प्रदर्शन देखील केले. पण संघाला विजय मात्र मिळाला नाही. नामिबियासाठी फिनिशरची भूमिका पार पाडणारा डेविड विसे (David Wiese) याची खेळू खरोखर कौतुकास पात्र होती.
#DavidWiese #T20worldcup22 pic.twitter.com/I3IWsr0CjT
— The sports 360 (@Thesports3601) October 20, 2022
विसेने शेवटच्या षटकापर्यंत संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. पण शेवटच्याच षटकात विकेट गमावल्यामुळे नामिबियाला विजय मिळवून देऊ शकला नाही. विश्वचषकातून बाहेर होण्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते. सामना संपल्यानंतर त्याच्या अश्रू अनावर झाले. सीमारेषेबाहेर गुडघ्यावर बसून तो रडत असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी यूएईचे खेळाडू देखील विसेला धीर देताना दिसत आहेत.
#DavidWiese #T20worldcup22 pic.twitter.com/hdvd85Jt4I
— The sports 360 (@Thesports3601) October 20, 2022
नामिबियाने लक्ष्याचा पाठलाग करताना 69 धावांवर सात विकेट्स गमावल्या होत्या आणि संघाला विजयासाठी सात षटकांमध्ये 80 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत विसेने 36 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या आणि रुबेन ट्रंपलमॅन (25) सोबत मिळून आठव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी पार पाडली. नामिबियाला शेवटच्या षटकात 14 धावांची आवश्यकता होती, पण षटकातील चौथ्या चेंडूवर विजे बाद झाला आणि त्यांचा संघ लक्ष्यापासून सात धावा दूर राहिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत इशान किशनने दाखवला जलवा, ठोकलं वादळी शतक
माजी ऑस्ट्रेलियान दिग्गज बनला पंजाब किंग्जचा प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आणणार कामी