केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील कबड्डीचे उपांत्य फेरीचे सामने आज(17 जानेवारी) रंगणार आहेत.
यात 21 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिला सामना चंदीगढ विरुद्ध केरळ संघात होणार आहे. तर दुसरा सामना उत्तर प्रदेश विरुद्ध तमिळनाडू संघात होणार आहे.
त्याचबरोबर 21 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिला सामना हरियाणा विरुद्ध उत्तर प्रदेश संघात होणार आहे आणि दुसरा सामना महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश संघात होणार आहे.
महाराष्ट्राचा फक्त 21 वर्षांखालील मुलींच्या संघाला उपांत्यफेरीत प्रवेश करण्यात यश आले आहे. मात्र महाराष्ट्राचे 17 वर्षांखालील मुले/मुली आणि 21 वर्षांखालील मुले यांचे संघ स्पर्धेबाहेर पडले आहेत.
17 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीतील पहिला सामना हरियाणा विरुद्ध बंगाल संघात होईल आणि दुसरा सामना छत्तीसगढ विरुद्ध उत्तरप्रदेश संघात होईल. तसेच 17 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिला सामना राजस्थान विरुद्ध छत्तीसगढ या संघात, तर दुसरा सामना हरियाना विरुद्ध दिल्ली संघात पार पडेल.
असे आहे खेलो इंडियातील कबड्डीच्या उपांत्य फेरीचे वेळापत्रक –
दुपारी 1.20 वाजता – हरियाणा विरुद्ध बंगाल (17 वर्षांखालील मुली)
दुपारी 2.05 वाजता – हरियाणा विरुद्ध उत्तर प्रदेश (21 वर्षांखालील मुली)
दुपारी 2.50 वाजता – राजस्थान विरुद्ध छत्तीसगढ़ (17 वर्षांखालील मुले)
दुपारी 3.35 वाजता – हरियाणा विरुद्ध दिल्ली (17 वर्षांखालील मुले)
दुपारी 4.30 वाजता – छत्तीसगढ़ विरुग्ध उत्तरप्रदेश (17 वर्षांखालील मुली)
दुपारी 4.30 वाजता – महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश (21 वर्षांखालील मुली)
संध्या. 7.00 वाजता – चंदीगढ विरुद्ध केरळ (21 वर्षांखालील मुले)
रात्री 8.00 वाजता – तमिळनाडू विरुद्ध उत्तर प्रदेश (21 वर्षांखालील मुले)
महत्त्वाच्या बातम्या –
–खेलो इंडिया: कबड्डीमध्ये २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्र उपांत्य फेरीत
–खेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश