Loading...

रणजी ट्रॉफी: पहिल्या दोन सामन्यांसाठी दिल्ली संघाची घोषणा, हा खेळाडू करणार नेतृत्व

9 डिसेंबरपासून रणजी ट्रॉफी या भारतातील देशांतर्गत स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील दिल्लीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी दिल्ली आणि डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनने 15 जणांच्या संघाची घोषणा केली आहे.

Loading...

दिल्ली संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी वरच्या फळीतील फलंदाज ध्रुव शोरेला दिली आहे. तर नितिश राणा उपकर्णधार असेल. तसेच या संघात प्रदिप सांगवान, नवदीप सैनी, अनुज रावत या खेळाडूंचा समावेश आहे.

मात्र दिल्लीच्या या संघात विराट कोहली, शिखर धवन, रिषभ पंत आणि इशांत शर्मा अशा वरिष्ठ खेळाडूंची निवड करण्यात आलेली नाही.

विराट आणि रिषभ हे वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेत व्यस्त असल्याने त्यांची निवड करण्यात आलेली नाही. तर शिखर सध्या दुखापतीतून सावरत आहे. तसेच इशांत अनुपलब्ध असल्याने त्याचा दिल्ली संघात समावेश नाही.

Loading...

याबरोबरच डीडीसीएने प्रांशु विजयरन, सारंग रावत, क्षितिज शर्मा आणि करन डागर या खेळाडूंना रणजी ट्रॉफीच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी राखीव खेळाडू म्हणून दिल्ली संघात ठेवले आहे.

दिल्लीचा पहिला सामना केरळ विरुद्ध होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना आंध्रप्रदेश विरुद्ध होईल.

पहिल्या 2 सामन्यांसाठी असा आहे दिल्ली संघ –

Loading...
Loading...

ध्रुव शोरे (कर्णधार), नितीश राणा (उपकर्णधार), कुणाल चंडेला, अनुज रावत (यष्टीरक्षक), जॉन्टी सिद्धू, ललित यादव, शिवम शर्मा, विकास मिश्रा, तेजस बरोका, प्रदीप सांगवान, नवदीप सैनी, पवन सुयल, कुंवर बिधुरी, हितेन दलाल , शिवांक वशिष्ठ.

राखीव खेळाडू –

प्रांशु विजयरन, सारंग रावत, क्षितिज शर्मा, करन डागर

You might also like
Loading...