शनिवारी (4 मार्च) महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाची सुरुवात होणार, त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली. डब्ल्यूपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जाणार आहे. तत्पूर्वी गुजरात जायंट्सच्या ताफ्यातून एक निराशा करणारी बातमी आली. वेस्ट इंडीजची अष्टपैलू डिएंड्रा डॉटिन हिला दुखापत झाल्यामुळे या संपूर्ण हंगामात ती खेळणार नाही, अशी माहिती फ्रँचायझीने दिली. पण आता या प्रकरणाला नवीन वळण आल्याचे दिसत आहे.
गुजरात जायंट्स (Gujarat Giants) संघाने डिएंड्रा डॉटिन (Deandra Dottin) हिला दुखापतग्रस्त घोषित केले. फ्रंचायझीने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू किम ग्रार्थ (Kim Garth) हिला डॉटिनच्या बदली खेळाडूच्या रोहिता संघात समील केल्याचेही माहिती दिली. पण वेस्ट इंडीज संघाची अष्टपैलू डॉटिनच्या मते ती खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे.
🚨 Another lioness from Down Under, @kim_garth joins our pride! 🇦🇺🦁#WPL #GujaratGiants #AdaniSportsline #Adani pic.twitter.com/vd9z6Ssp0i
— Gujarat Giants (@GujaratGiants) March 3, 2023
गुजरात जायंट्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून डिएंड्रा डॉटिन आगामी आयपीएल हंगामासाठी उपलब्ध नसले, अशी सविस्तर माहिती दिली. फ्रँचायझीने वेस्ट इंडीजच्या या दिग्गज खेळाडूला लवकर दुखापतीतून सावरण्यासाठी प्रार्थना केली असून किम गार्थ आगामी डब्ल्यूपीएलमध्ये तिची जागा घेणार असल्याचे सांगितले. डब्ल्यूपीएलच्या या पहिल्या हंगामासाठी झालेल्या लिलावात गुजारात जायंट्स संघाने डॉटिनला 60 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. डॉटिन या लिलावात 50 लाख रुपयांच्या बेस प्राईससह उतरली होती. तत्पूर्वी डॉटिनने मागच्या वर्षी कॉमनवेल्थ गेम्स संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधीन निवृत्ती घोषित केली होती.
I leave that in God’s hands cause he don’t sleep. #GodIsGood #GodIsInControl 🙏🏾🙏🏾
— Deandra Dottin (@Dottin_5) March 3, 2023
गुजरात जायंट्सने तिच्या बदली खेळाडीची घोषणा करण्यापूर्वी डॉटिनशी चर्चा न केल्याचे सध्या तरी दिसत आहे. संघाने तिच्या जागी किम गार्थला संधी दिल्यानंतर डॉटिनने अधिकृत ट्वीटर खात्यावरून पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. डॉटिनने या ट्वीटमध्ये लिहिले की, “मी ही आता देवावर सोपवले आहे, कारण तो कधी झोपलेला नसतो.” डॉटिनच्या या ट्वीटमुळे डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम सुरू होण्याआधीच वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, शनिवारी डब्ल्यूपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जाणार आहे. पण या पहिल्या सामन्याआधीच हे प्रकरण समोर आले आहे.
I really appreciate all the messages but truth be told I’m recovering from nothing but the Holy Ghost anointing thank you 🙏🏾 #GodIsGood #GodIsInControl
— Deandra Dottin (@Dottin_5) March 4, 2023
पहिल्या डब्ल्यूपीएल हंगामासाठी गुजरात जायंट्स संघ –
अश्वनी कुमारी, हरलीन देओल, डिएंड्रा डॉटिन (हंगामातून माघार), सोफिया डंकले, हर्ले गाला ,ऍश्ले गार्डनर, किम गार्थ, दयालन हेमलता, मानसी जोशी, तनुजा कंवर, सभिनेनी मेघना, बेथ मुनी, मोनिका पटेल, स्नेह राणा, शबनम एमडी, पारुनिका सिसोदिया एनाबेल संडरलँड, सुषमा वर्मा, जॉर्जिया वेरेहम,
(Deandra Dottin will not play in WPL 2023 despite being fit. Gujarat Giants has replaced her with an Australian player in the team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डब्ल्यूपीएलमधील विदेशी कर्णधारांमुळे भारतीय खेळाडू निराज! माजी दिग्गजासमोर व्यक्त केली खंत
‘याचा एक पाय चंदीगडमध्ये आणि दुसरा…’, श्रेयस अय्यरने ट्रेविस हेडला केले स्लेज