fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

दिलदार दादा! गरीब लोकांना गांगुली वाटणार मोफत तांदूळ

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पसरला आहे. त्याचबरोबर तो आता भारतात वेगाने पसरू पाहतोय. या व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी लोकांना सरकारी शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे.

या गरजू लोकांसाठी बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) 50 लाख रुपयांचे तांदुळ (50 Lakh Rupees Rice) मोफत वाटणार आहे. त्यासाठी गांगुली आणि लाल बाबा तांदुळ (Lal Baba Rice) यांच्यात करार करण्यात आला आहे.

“आशा आहे की गांगुलीचे हे काम पाहुन अनेक लोक राज्यातील इतर लोकांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतील. यापूर्वी, बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारला 25 रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएबीचे (Bengal Cricket Association) अध्यक्ष अभिषेक दालमियानेही (Abhishek Dalmiya) राज्य सरकारला मदत करण्याची घोषणा केली होती,” असे एका वृत्तात म्हटले आहे.

यावेळी सीएबीने स्पष्ट केले की, “कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत सर्वांचे लक्ष संरक्षण आणि संसाधनांवर उपाय शोधण्यात आहे. अशामध्ये आता सीएबीने या व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारला २५ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.”

ट्रेंडिंग घडामोडी-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

-आयपीएल व बीबीएलमध्ये शतक केलेले ते आहेत जगातील केवळ ३ खेळाडू

-रनमशीन विराट कोहलीसाठी हे ५ विक्रम मोडणं जरा कठीणच

You might also like