सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. त्या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. त्यामुळे या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सिडनीत खेळला जाणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघात उमेश यादवच्या जागी कोणाला संधी दिली जावी, यावरुन भारतीय संघासमोर पेच निर्माण झाला आहे. मात्र भारतीय संघाचे माजी खेळाडू दीपदास गुप्ता आणि प्रज्ञान ओझा यांचे मत आहे की शार्दूल ठाकूरला संधी दिली जावी.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेतील प्रत्येकी एक सामना जिंकून मालिकेत बरोबरी केली आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या दृष्टीने सिडनीत होणारा तिसरा सामना महत्वाचा आहे. या सामन्यात भारतीय संघ आपल्या दमदार खेळाडूंच्या ताफ्यासोबत उतरताना दिसेल. मात्र उमेश यादवला दुसर्या डावात दुखापत झाल्याने त्याची जागा रिक्त आहे. त्यामुळे आता पेच असा निर्माण झालाय जागा एक आणि तीन दावेदार आहेत. यामध्ये शार्दूल ठाकूर, टी नटराजन आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे.
इंडिया टुडेच्या माहितीनुसार प्रज्ञान म्हणाला, “मला वाटते तुमच्या जवळ आता एक पर्याय आहे. हे स्पष्ट आहे की, तो पर्याय शार्दूल ठाकूर आहे. जो चेंडू स्विंग करू शकतो. चेंडू स्विंग करणे ही त्याची ताकद आहे. तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहमद सिराज आहेत. जे चेंडू वेगाने टाकू शकतात आणि त्याचबरोबर विकेट पासून दूर ठेवू शकतात. मात्र शार्दूल ठाकूर स्विंग करू शकतो. जर तुम्हाला वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज हवा असेल तर तो नवदीप सैनी आहे.”
प्रज्ञान ओझाच्या मताशी सहमती दर्शविताना दीपदास गुप्ता म्हणाले, “सिडनीतील परिस्थिती बघता भारतीय संघासाठी शार्दूल ठाकूर फायदेशीर ठरू शकतो.”
शार्दूल ठाकूरला संधी मिळण्याची जास्त शक्यता
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार्या तिसर्या कसोटी सामन्यासाठी उमेश यादवच्या जागी शार्दूल ठाकूर प्रमुख दावेदार आहे. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची संधी जास्त आहे. त्यामुळे नवदीप सैनी आणि टी नटराजन यांना बाहेर बसवले जाऊ शकते. भारतीय संघ पाच गोलंदाजासोबत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूर फलंदाजी सुद्धा करू शकतो. यामुळे त्याला अंतिम अकरात स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे.
त्याचबरोबर भारतीय संघात टी नटराजनला संधी दिली जावी ही चर्चा जोर धरत आहे. परंतु भारतीय संघ व्यवस्थापन परिस्थिती आणि गरजेच्या हिशोबाने संघ निवड करेल. शार्दूल ठाकूर गोलंदाजी आणि वेळ पडल्यास फलंदाजी सुद्धा करू शकतो त्यामुळे त्याला संधी मिळते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरू शकते.
महत्वाच्या बातम्या:
पाकिस्तानचा संघ शाळकरी दर्जाचा, माजी वेगवान गोलंदाजाची जहरी टीका
SA vs SL : सांघिक कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले, मी स्टीव्ह स्मिथला कोचिंग करत नाही, कारण