भारतीय महिला हॉकी संघाची डिफेंडर दीप ग्रेस एक्का हिचे म्हणणे आहे की, संघाच्या डिफेन्समध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचे मिश्रण असल्यामुळे टोकियो ऑलिंपिकमध्ये संघाला खूप फायदा होईल.
एक्का म्हणाली की, “संघाच्या डिफेन्समध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले संतुलन आहे. त्यामुळे आम्ही युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत आहोत, जेणेकरुन त्यांच्या खेळात अजून जास्त सुधारणा होतील. मला पूर्ण विश्वास आहे की, येत्या काही महिन्यात आमचा डिफेन्स अजून जास्त मजबूत बनेल.”
“ज्या संघाचा डिफेन्स जास्त मजबूत असतो, त्या संघाच्या विजयाच्या आशा अधिक वाढत जातात. त्यामुळे जर आमचा डिफेन्स जास्त बळकट बनला तर ऑलिंपिकसारख्या मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला खूप मदत मिळेल.” असे ती शेवटी बोलताना म्हणाली.
भारतीय महिला हॉकी संघाने गेल्या काही वर्षांत मोठ-मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. यात २०१८ सालच्या आशियाई क्रिडा स्पर्धेचा समावेश आहे. या स्पर्धेत संघाने रौप्य पदक मिळवले होते. तसेच गतवर्षी त्यांनी एफआयएच महिला सीरिज जिंकली होती. त्यामुळे येत्या टोकियो ऑलिंपिकमध्येही घवघवीत यश मिळवण्याच्या दृष्टीने संघ तयारीला लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑलिंपिक तयारीसाठी हॉकी इंडियाने कसली कंबर, क्रिडाविषयक…
नुकताच कोरोनातून बरा झालेला खेळाडू म्हणतोय, “आता लागतो ‘या’ गोष्टीच्या तयारीला”
आनंदाची बातमी! हरियाणातील छोट्या गावात बनणार आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैदान, ‘हा’ खेळाडू झाला खूश