fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

डाॅक्टरांनी सांगितलं होतं चालणंही आहे कठीण, पुढे २०वर्ष कष्ट करुन झाली खेलरत्न

Deepa Malik had paralysis at the age of 30 years

देशातील क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळविणाऱ्या पॅरालिम्पिकपटू दिपा मलिकने सोमवारी (११ मे) निवृत्तीची घोषणा केली आहे. पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय पॅरालिम्पिक संघटनेचे अध्यक्ष होण्यासाठी तिने ही निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने हा निर्णय या वर्षाच्या सुरुवातीलाच अध्यक्ष होण्यापुर्वीच घेतला होता.

दिपाने १६ सप्टेंबरलाच राजीनाम्याचे पत्र पीसीसीआयला दिले होते, परंतु त्यांनी सोमवारी हे पत्र खेळ व युवक कल्याण विभागाला दिले. दिपा पीसीसीआयच्या नविन कमिटीच्या स्थापनेची हायकोर्टाच्या आदेशाची वाट पहात होती. जो निर्णय दिपाच्या बाजूने लागला. त्यामुळे दिपा आता भारतातील पॅरालिम्पिकपटूंसाठी काम करणार आहे. शिवाय बोलताना दिपाने २०२२च्या आशियाई खेळांमध्ये खेळणार असल्याचे संकेत दिले.

दिपाचा जन्म ३० सप्टेंबर १९७० ला हरियाणातील सोनीपत येथे झाला होता. ती गेल्या १९ वर्षांपासून व्हिलचेयरचा वापर करत आहे. ती ३० वर्षांची असताना एका आजारामुळे तिचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्यानंतर तिच्या कमरेपासूनच्या खालील शरीराला अर्धांगवायू (लकवा) झाला. त्यामुळे ती चालू शकत नाही. तिला जेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की, ती चालू शकत नाही. तेव्हा ती खूप रडली होती. Deepa Malik had paralysis at the age of 30 years.

दिपा ही पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला ऍथलेट होती. तिने २०१६ला रिओ ऑलिंम्पिकमधील गोळाफेकमध्ये रौप्यपदक मिळवले होते. तर, २०१६मध्ये तिला आयपीसी ओशिनिया आशिया चॅम्पियनशीपमधील भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळाले होते. तसेच, दिपाला २०१०च्या पॅरागेम्समधील भालाफेकमध्ये कांस्यपदक, २०१४च्या भालाफेकमध्ये रौप्यपदक आणि २०१८च्या जकार्ता येथील थाळीफेक आणि भालाफेकमध्ये तिला कांस्यपदक मिळाले होते.

दिपाच्या या कारनाम्यामुळे तिला २०१२ला अजुर्न पुरस्कार, २०१४ला अध्यक्ष रोल मॉडेल (प्रेसिडेंट रोल मॉडेल) आणि २०१९ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राष्ट्रीय क्रिडा कोडनुसार, एक सक्रिय ऍथलेट कोणत्याही फेडरेशनमध्ये अधिकृतपणे पदभार सांभाळू शकत नाही. याच नियमाचे पालन करत दिपाने तिच्या निवृत्तीची घोषणा केली. ती म्हणाली की, “मी निवृत्तीची घोषणा करणे महत्त्वाचे होते. मला देशाच्या नियमानुसार वागावे लागेल. पण गरज भासल्यास मी २०२२ला माझ्या निर्णयात बदल करू शकते.”

ट्रेंडिंग घडामोडी-

म्हणून तब्बल १ वर्ष सचिन समोर जेवण करत नव्हता हा भारतीय क्रिकेटपटू

आता जर टीम इंडिया मागे हटली तर कसोटी क्रिकेट संपून जाईल

न्यूझीलंडला विश्वचषक फायनलमध्ये पोहचविणारा ‘खेळाडू’ शोधतोय…

You might also like