१९ सप्टेंबरपासून युएईत सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या मोसमाआधी चेन्नई संघाला अनेक धक्के बसले. त्यांचे १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यात दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड या २ खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे संघाचा क्वारंटाईनचा कालावधी वाढला. पण आता असे वृत्त येत आहे की चाहर तसेच ऋतुराज दोघांचाही कोरोना अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार चाहर आणि गायकवाडसह अन्य सदस्यांचेही कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यांची ३ सप्टेंबरला पुन्हा चाचणी होईल. त्यातही त्यांचा अहवाल निगेटिव्ह येणे गरजेचे आहे.
तसेच अहवाल निगेटिव्ह आला असला तरी चाहर आणि ऋतुराज दोघेही त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करतील आणि १२ सप्टेंबरनंतरच सरावाला सुरुवात करु शकतील.
एका सुत्राने सांगितले की ‘आम्हाला आशा आहे की सर्वकाही पुढील काही दिवसात ठिक होईल आणि आम्ही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करु.’
आता सीएसके संघातील ज्या सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आशा असेल की येत्या काही काळात सराव सत्रात भाग घेऊ शकतील.
चेन्नई सुपर किंग्स संघ मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. त्यांच्या संघातील प्रमुख फलंदाज सुरेश रैनाही या हंगामात खेळणार नाही. तो वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला आहे.
असे असतानाच सीएसकेसाठी आणखी चांगली गोष्ट घडली ती म्हणजे त्यांच्या संघातील फाफ डु प्लेसिस आणि लुंगी एन्गिडी हे २ दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू युएईमध्ये दाखल झाले आहेत. तसेच लवकरच हरभजन सिंगही युएईला येईल. तो अजूनही युएईमध्ये का दाखल झालेला नाही याबद्दलचे कारण समजू शकलेले नाही.
Early morning glories from the Rainbow Nation! #StartTheWhistles #HomeSweetDen 🦁💛 pic.twitter.com/fGOtgJ1LIN
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 1, 2020
सीएसके हा आयपीएलमधील एक यशस्वी संघ समजला जातो. त्यांनी आत्तापर्यंत ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच त्यांनी खेळलेल्या प्रत्येक हंगामात प्लेऑफची फेरी गाठली आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामात सर्व संघांचे सर्व सदस्य जैव सुरक्षित वातावरणात रहाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
हा भारतीय क्रिकेटर म्हणतोय, त्याच्यात आहे भविष्यवाणी करण्याची क्षमता
धोनी क्रिकेटमध्ये एका योग्यासारखा, या भारतीय दिग्गजाने व्यक्त केले मत
मैदानावर उतरताच ‘हा’ खेळाडू म्हणतोय, आता तुरुंगातून सुटल्यासारखे वाटत आहे…
ट्रेंडिंग लेख –
जर ही गोष्ट घडली नसती तर अँडरसनच्या आधीच ‘या’ ३ वेगवान गोलंदाजांनी घेतल्या असत्या कसोटीत ६०० विकेट्स
रंगअंधत्व असतानाही मोठी कारकिर्द घडवणाऱ्या ख्रिस राॅजर्सबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?