भारतात दोन गोष्टी खूप लोकप्रिय आहेत, एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरी म्हणजे बॉलिवूड. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी खूप जोडल्या गेलेल्या आहेत. अनेक क्रिकेटपटूंनी आपला जोडीदार बॉलीवूडमधून निवडला आहे, हे काही नवीन नाही. बॉलिवूडचे आणि क्रिकेटचे हे नाते खूप पूर्वीपासून आहे, जे अजूनही चालू आहे. सध्याचा भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मादेखील बॉलिवूड अभिनेत्री आहे. तसेच अनेक क्रिकेटपटू अजूनही बॉलीवूडमधील कलाकारांना डेट देखील करत आहे. त्यातच आता भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरचे देखील नाव जोडले गेले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार दीपक चाहर बिग बॉस ५ मधील स्पर्धक सिद्धार्थ भारद्वाजची बहिण जया भारद्वाजला डेट करत असल्याची माहिती समोर येत आहे. दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात देखील बांधले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ईटाइम्सच्या एका सूत्रानुसार, दोघेही आयपीएलपूर्वीच आपला साखरपुडा देखील उरकून घेऊ शकतात. तसेच आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जया दीपकसोबत दुबईला देखील रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
जया भारद्वाज ही सिद्धार्थ भारद्वाजची बहिण आहे. जो टीव्ही रियॅलिटी शो बिग बॉस ५ चा प्रतिस्पर्धी होता. तसेच सिद्धार्थ व्हीजे मॉडल आणि एमटीव्ही स्प्लिट्सविलाचा विजेता देखील राहिला आहे. तसेच त्याने फिअर फॅक्टर खतरो के खिलाडीच्या ६ व्या हंगामात देखील सहभाग नोंदवला होता.
https://www.instagram.com/p/B-u1BVwDc5B/?utm_source=ig_web_button_share_sheet
तर दीपक चाहरची लहान बहीण मालती चाहरदेखील एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. २०२० मध्ये दीपकला बांगलादेश विरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे आयसीसीकडून टी-२० आंतरराष्ट्रीय ‘परफॉर्मन्स ऑफ द इयर’ या सन्मानाने गौरविण्यात आले होते.
जया ही दिल्लीची असून ती कॉर्पोरेट क्षेत्रात काम करते. चाहरने यापूर्वीच भारतीय संघातील खेळाडूंसोबत जयाची ओळख देखील करून दिली होती. यावरून तर्क लावण्यात येत आहे की, दीपक लवकरच जया भारद्वाजसोबत लग्न करू शकतो.
https://www.instagram.com/p/BxW65dKnmyE/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान, दीपक आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून (सीएसके) खेळतो. सध्या एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालीलd सीएसकेचा संघ आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दुबईला पोहोचला आहे. तिथे त्यांच्या सराव सत्राला देखील सुरुवात झाली आहे. चाहरने भारतात झालेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. सीएसके आयपीएलच्या गुणतालिकेत ७ पैकी ५ सामन्यात विजय मिळवून १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
–खराब फॉर्मातील अजिंक्यच्या हातून निसटणार उप-कर्णधारपद, मग रोहितच्या खांद्यावर येणार ही जबाबदारी?
–इंग्लंडचा मोठा निर्णय; पितृत्व रजेमुळे बटलर उर्वरित मालिकेतून बाहेर, ‘हा’ खेळाडू नवा उपकर्णधार
–चौथ्या कसोटीतील ५ दिवस कसे असेल लंडनचे हवामान? पावसाची आहे दाट शक्यता