भारत आणि वेस्ट इंडिज (WIvsIND) यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. फ्लोरिडा येथे झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला या सामन्यात पराभूत केले. यामुळे भारताने मालिकेत ३-२ असा विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीपक हुड्डाने संथ गतीने फलंदाजी केल्याने तो चांगलाच ट्रोल होत आहे.
भारताने प्रथम गोलंदाजी करत २० षटकात ५ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या. भारताची फलंदाजी उत्तम झाल्याने संघाने मोठी धावसंख्या उभारली, तर दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने १९ चेंडूत २१ धावा केल्या. त्यात २ चौकारांचा समावेश आहे. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो लवकरच बाद झाल्याने त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.
हुड्डाने आयर्लंड दौऱ्यात खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत शतक केले होते. तेव्हा त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अशातच त्याने प्रत्येक टी२० सामन्यात सर्वाधिक धावा करायाच्या अशी आपेक्षा केली जात होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत दुसऱ्यांदा त्याला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
पहिल्या सामन्यात हुड्डाने तर नाबाद १० धावा केल्या होत्या. चौथ्या सामन्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोन महत्वाच्या विकेट गेल्याने हुड्डाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्याने निराशा केली आहे. लागोपाठ दोन सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरत आहे. अशातच त्याला ट्रोल करण्यात आले असून काही चाहत्यांनी त्याला स्वार्थी देखील म्हटले आहे.
Selfish knock by hooda came to end ….i troll player now only for reply of Iyer trolling 😡…@ShreyasIyer15 @HoodaOnFire #INDvsWIt20
— xyz (@xyz00339817) August 6, 2022
https://twitter.com/imShrey1817/status/1555951200301875200?s=20&t=OM6aKgAlWDAP2LkqTfMhEw
@HoodaOnFire you don't belongs to international cricket touch much hype wasting a good batter bring someone who has the ability to play good pacers ever average pacers in Aus the bowlers will chew Deepak we have seen 2-3 time on this tour.@indvswi
— Kapil Pandel (@kapilpandel1) August 6, 2022
याच वर्षी भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या हुड्डाने श्रीलंकेविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे. आतापर्यंत त्याने ८ सामन्यातील ६ डावात खेळताना ५९च्या सरासरीने २३६ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
CWG 2022 | स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पक्कं केलं पदक, फायनलमध्ये मिळवली जागा
खुद्द पंतप्रधानांनी ज्याचं कौतुक केलं, तो बीड जिल्ह्याचा अविनाश साबळे आहे तरी कोण?
त्याला काय फिरायला आणलंय? वेस्ट इंडिज दौऱ्यावर एका संधीसाठी तरसतोय ‘हा’ टॅलेंटेड भारतीय स्पिनर