आज क्रीडा क्षेत्रातील यावर्षीच्या पुरस्कारांसाठी खेळाडूंची अंतिम निवड क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. यामध्ये कबड्डीपटू दीपक निवास हुडाला यावर्षीचा अर्जून पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच्यासह अन्य क्रीडा प्रकारातील एकूण २७ खेळाडूंना हा पुरस्कार यावर्षी मिळणार आहे.
दीपकने भारताकडून २०१६ चा विश्वचषक तसेच २०१६ आणि २०१९ च्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. दुबईत २०१८ साली झालेल्या दुबई मास्टर्स स्पर्धेतही त्याने भारताकडून सुवर्णपदक मिळवले होते.
Breaking – Deepak Hooda will be conferred with Arjuna Award on 29th August 2020 as reported by DNA#khelkabaddi @DeepakHooda5555 pic.twitter.com/LTDlqpp6Lh
— Khel Kabaddi (@KhelKabaddiNews) August 21, 2020
दीपक व्यतिरिक्त कबड्डी प्रशिक्षक कृष्ण कुमार हुडा यांना द्रोणाचार्य जीवनगौरव द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगट, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, पॅरा ऍथलिट मरियप्पन थंगवेलू आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच ५ खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळणार आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या खेळाडूंना २९ ऑगस्ट रोजी पुरस्कार दिला जाईल. २९ ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी पुरस्कर वितरण सोहळा कोरोना व्हायरसमुळे ऑनलाईन होणार आहे.