भारतीय बॉक्सर दीपक कुमारने ७२व्या स्ट्रँडजा मेमोरियल टूर्नामेंटमध्ये आपली विजयी घौडदौड सुरू ठेवली आहे. पुरुषांच्या ५२ किलोग्राम वजनीगटात उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने बलगेरियाच्या दरीस्लाव वासिलेव या स्थानिक प्रतिस्पर्ध्याला सोफिया येथे चौथ्या दिवशी ५-० ने हरवत विजय मिळविला आहे.
आशियाई स्पर्धेत रौप्यपदक विजेता दीपक पूर्ण सामन्यात संपूर्ण नियंत्रणात दिसला. दीपक रिंगच्या आत आपल्या हालचालींमध्ये वेगवान होता आणि वेगवान हालचालींमुळे त्याच्या बल्गेरियन प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी मिळू शकली नाही. या विजयासह दीपक नवीन बुरा (६९ किलोग्राम) नंतर पदक निश्चित करणारा दुसरा भारतीय बनला असून त्याने चालू असलेल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे आणि देशाला दुसर्या पदकाची ग्वाही दिली.
शुक्रवारी(२६ फेब्रुवारी) रात्री दोन्ही भारतीय बॉक्सर्स आपापल्या उझबेकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याशी खेळतील. दीपकला रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन शाखोबिडिन झोइरोवचे कडवे आव्हान असेल तर बुराची आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता बोबो-उस्मान बतुरोव विरुद्ध लढत होईल.
दरम्यान, भारतीय महिला बॉक्सर ज्योती गुलिया (५१ किलो) आणि भाग्यबती कचहरी (७५ किलो) यांना उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ५-० ने पराभव पत्करावा लागला. गुलियाचा रोमानियन बॉक्सर लक्रॅमिओआरा पेरिझोक हीच्याकडून पराभव झाला, तसेच कचहरी अमेरिकेच्या जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेती नाओमी ग्रॅहमविरुद्धही पराभूत झाली. आर्मेनियाच्या गुर्गेन होव्हनिनिस्यानकडून मनजित सिंगलाही ९१+ किलो विभागात पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! सुप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स कार अपघातात गंभीर जखमी
कराटेपटू रोहित भोरे यांची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
मुंबई फालकन्स संघाने रचला इतिहास, एफ ३ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत मिळवले तिसरे स्थान