दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा दुसरा सामना वेस्ट इंडीज संघाशी झाला. केपटाऊन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना वेस्ट इंडीजला 6 बाद 118 धावांवर रोखले. अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने तीन बळे मिळवत भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली. याचबरोबर तिने भारतासाठी पुरुष व महिला क्रिकेटमध्ये मिळून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 बळी मिळवण्याचा कारनामा केला.
Deepti Sharma becomes the leading wicket taker for India in T20I history. pic.twitter.com/gTh4DAGYCs
— Johns. (@CricCrazyJohns) February 15, 2023
सध्या गोलंदाजीच्या शानदार फॉर्म मध्ये असलेल्या दीप्तीने या सामन्यात सर्व क्षणी गोलंदाजी केली. पॉवर प्ले, मधली षटके तसेच डेथ ओवर्समध्ये तिने गोलंदाजी केली. तिने आपल्या चार षटकांमध्ये केवळ 15 धावा देत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासोबतच तिने टी20 क्रिकेटमध्ये शंभर बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारी ती पुरुष व महिला मिळून पहिलीच भारतीय गोलंदाज ठरली.
तिच्या आधी भारताची अनुभवी फिरकीपटू पुनम यादव हिने 98 आंतरराष्ट्रीय टी20 बळी टिपलेले. या यादीमध्ये राधा यादव 67 बळींसह तिसऱ्या स्थानी तर राजेश्वरी गायकवाड 58 बहिण सह चौथ्या क्रमांकावर आहे. पुरुष क्रिकेटचा विचार केल्यास भारताचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल 91 बळींसह पहिल्या क्रमांकावर दिसून येतो. तर, अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा 90 बळींसह दुसऱ्या व रविचंद्रन अश्विन 72 बळींसह तिसऱ्या स्थानी काबीज आहे.
या सामन्याचा विचार केल्यास भारतीय गोलंदाजांनी प्रथम गोलंदाजी संधी मिळाल्यावर वेस्ट इंडीज संघाला दबावात ठेवले. कर्णधार मॅथ्यूज दुसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर टेलर व कॅम्पबेल यांनी 73 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर दीप्ती व इतर गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजला 119 पर्यंत मर्यादित ठेवले. दीप्ती व्यतिरिक्त पूजा वस्त्रकार व रेणुका सिंग यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
(Deepti Sharma Becomes First Indian Bowler In Mens And Womens Cricket Who Took 100 T20I Wickets)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनली टीम इंडिया, इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडले
नागपूर कसोटी गाजवलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा रँकिंगमध्ये बोलबाला, अश्विन-जड्डू टॉपवर