क्रिकेटच्या इतिहासाची पाने उलगडून पाहिली, तर लाखो विक्रमांची नोंद असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. दररोज क्रिकेटच्या मैदानावर कित्येक जुने विक्रम मोडत असतात, सोबतच नव्या विक्रमांचीही भर पडत असते. युरोपीय देशात खेळल्या जात असलेल्या एका क्रिकेट स्पर्धेत एका गोलंदाजाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. युरोपात सुरू असलेल्या टी१० स्पर्धेत त्या गोलंदाजाने एकाच षटकात तब्बल पाच विकेट्स घेण्याची किमया केली आहे.
युरोपमधील टी१० स्पर्धेच्या विंटरथर संघाकडून खेळणारा श्रीलंकन क्रिकेटपटू ‘दीश बन्नेहेका’ याने हा पराक्रम केला आहे. यासह क्रिकेट इतिहासात, खासकरुन टी१० स्पर्धेत असा अनोखा पराक्रम करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे.
प्रतिस्पर्धी संघाचा डाव १ बाद ७५ धावांवर असताना आठवे षटक टाकण्यासाठी दीश बन्नेहेकाला बोलावण्यात आले होते. त्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेतली. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकला. पुढे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या अशा सलग चार चेंडूंवर सलग चार विकेट घेत त्याने सामन्याचा कायापालट केला. पण शेवटी त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
😳 Ever seen 5 wickets in an Over!?! 😳 -🇨🇭
🏏1000 Live & Exclusive European Cricket Matches in 2021 on @SportsFlick Worldwide + @Dream11 & @FanCode in India! 🏏#dream11 #fancode #sportsflick #cricket @CricketSwiss pic.twitter.com/Q3Y4TmJbvR— European Cricket (@EuropeanCricket) December 15, 2020
इतर विलक्षण गोलंदाजी विक्रम
दीश बन्नेहेकापुर्वी बऱ्याच गोलंदाजांनी या विक्रमाशी मिळताजुळता विक्रम केला आहे. पण कोणत्याही गोलंदाजाला एका षटकात शून्य धावा देत ५ विकेट घेण्याची अनोखी कामगिरी करता आलेली नाही. श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगाने वनडेत दोन वेळा सलग ४ चेंडूत ४ विकेट घेतल्या होत्या. हा विक्रम करणारा तो पहिला गोलंदाज आहे.
तसेच, भारतीय गोलंदाज दीपक चाहरने टी२० क्रिकेटमध्ये ७ धावा देत ६ फलंदाजांना बाद करण्याची किमया केली आहे, तर वेस्ट इंडिजचा गोलंदाज कर्टनी वॉल्श यानेदेखील एका धावेवर ५ विकेट्स घेण्याचा मोठा कारनामा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात टीम इंडियापुढे मोठे आव्हान, ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर दुखापतीतून बरा