आयपीएलचा 13 वा मोसम सुरु होण्यासाठी अजून जवळ जवळ 9 महिने बाकी आहेत. पण या मोसमासाठी संघांनी तयारी सुरु केली आहे. तसेच अनेक संघांचे प्लेअर ट्रान्सफरचेही प्रयत्न सुरु आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघही अनेक वर्षांपासून राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेला संघात सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आयएएनएसशी बोलताना एका सुत्रांनी सांगितले की ‘दिल्ली कॅपिटल्स रहाणेला संघात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा करार होईलच हे इतक्या लवकर निश्चितपणे सांगणे कठीण आहे. हा करार करताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत. तो अनेक वर्षांपासून राजस्थान रॉयल्सचा एक ब्रँडअँबेसिडर आहे. पण कराराबद्दल चर्चा सुरु आहे.’
त्यामुळे आता हा करार होणार का हे पहावे लागणार आहे. जर दिल्लीने रहाणेला संघात सामील करुन घेण्यात यश मिळवले तर दिल्ली संघात शिखर धवनसह अजिंक्य रहाणेच्या रुपात एक अनुभवी फलंदाज मिळेल. शिखरला दिल्लीने मागीलवर्षी सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून प्लेअर ट्रान्सफरमध्येच घेतले होते.
तसेच यावर्षीही दिल्लीने मुंबई इंडियन्सकडून मयंक मार्कंडे या युवा गोलंदाजाला संघात घेतले आहे, तर शेरफान रुदरफोर्डचे मुंबई इंडियन्सला ट्रान्सफर केले आहे.
रहाणेने आयपीएलमध्ये 2008 आणि 2009 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच 2010 मध्ये तो आयपीएलमध्ये खेळला नाही. 2011 मध्ये राजस्थानने त्याला आपल्या संघात घेतले. तेव्हापासून रहाणे राजस्थानकडून खेळत आहे. फक्त राजस्थान संघावर 2016 आणि 2017 ला बंदी असताना रहाणे रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला.
त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 140 सामन्यात 3820 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 शतकांचा आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–श्रेयस अय्यरबद्दल सुनील गावस्करांनी केले मोठे भाष्य
–विराट वनडेत करणार ‘एवढी’ शतके, भारताच्या माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
–राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश; आयसीसीने केली मोठी घोषणा