महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 11वा सामना दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला संघात सोमवारी (दि. 13 मार्च) खेळला जाणार आहे. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. यापूर्वी 7 वाजता उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक दिल्ली कॅपिटल्स संघाने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकून दिल्ली गुणतालिकेतील स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करेल, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ स्पर्धेतील पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
मेग लॅनिंग (Meg Lanning) हिच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स महिला (Delhi Capitals Women) संघात दोन बदल झाले आहेत. दिल्ली संघात ऍलिस कॅप्सी आणि अरुंधती रेड्डी यांचे संघात पुनरागमन झाले आहे. याव्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला (Royal Challengers Bangalore Women) संघातही बदल असल्याचे कर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने सांगितले आहे.
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स महिला संघाने खेळलेल्या 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तसेच, एक सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर महिला संघ स्पर्धेत खेळलेल्या चारही सामन्यात पराभूत झाला आहे. (Delhi Capitals Women won the toss and opt to ball first)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स संघ
मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ऍलिस कॅप्सी, जेमिमा रॉड्रिग्ज, मारिजाने कॅप, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, शिखा पांडे, तारा नॉरिस
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ
स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिवाईन, एलिस पेरी, हीदर नाईट, ऋचा घोष (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शूट, आशा शोबाना, रेणुका ठाकूर सिंग, प्रीती बोस
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही एकमेकांशिवाय अपूर्ण…’, मालिकावीर अश्विन-जड्डूने गायले एकमेकांचे गुणगान, तुम्हीही कराल कौतुक
ही दोस्ती तुटायची नाय! BGT मालिका विजयानंतर रोहितकडून विराटचे कौतुक; म्हणाला, ‘आम्ही त्याच्यामुळेच…’