इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग- दिलेर दिल्ली संघाचा तेलुगु बुल्स संघावर 40-31 असा विजय

पुणे । पिछाडीवरुन खेळाडूंनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर दिलेर दिल्ली संघाने इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग कबड्डी स्पर्धेत तेलुगु बुल्स संघावर 40-31 अशा फरकाने विजय मिळवला. पहिल्या क्वॉर्टरमध्ये पिछाडीवर असताना देखील दिल्लीच्या संघाने जोरदार खेळ करत विजयावर शिक्कमोर्तब केले.
पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम येथे सुरू असलेल्या या सामन्यात तेलुगु बुल्स व दिलेर दिल्ली संघांमध्ये चुरस पहायला मिळाली. तेलुगु बुल्स संघाने मात्र पहिल्या क्वॉर्टरमध्ये आघाडी घेतली. तेलुगु संघाच्या चढाईपटू व बचावपटूंनी एकत्रित चांगली कामगिरी करत पहिल्या क्वॉर्टरमध्ये 13-7 अशी आघाडी घेतली. दुस-या क्वॉर्टरमध्ये दिल्लीच्या खेळाडूंनी चांगलाच जोर लावला. त्यांनी दुसरे क्वॉर्टर 8-6 असे आपल्या नावे केले असले तरीही तेलुगु बुल्स संघाने पहिल्या क्वॉर्टरमधील चांगल्या कामगिरीमुळे मध्यंतरापर्यंत 19-15 अशी आघाडी घेतली.
तिस-या क्वॉर्टरमध्ये दिलेर दिल्लीच्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावला.संदीप चिल्लरने चढाईत चमक दाखवली. त्याला हरदीप चिल्लर, सुनिल जयपाल यांनी देखील चांगली साथ दिली. त्यामुळे दिल्लीच्या संघाने 14-5 अशी तिस-या क्वॉर्टरमध्ये आघाडी घेतली. त्यामुळे तेलुगु बुल्स संघाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.शेवटच्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये गुणांसाठी चांगली चुरस पहायला मिळाली.तिस-या क्वॉर्टरमधील आपला हा फॉर्म दिल्लीच्या संघाने शेवटच्या क्वॉर्टरमध्ये देखील कायम ठेवला व तेलुगु संघाला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी न देता विजय मिळवला.

Related Posts

रविवारचे सामने :
– हरयाणा हिरोज वि.पुणे प्राईड (13 वा सामना ) ( 8 -9 वाजता)
– पाँडिचेरी प्रिडेटर्स वि.बंगळुरु रायनोज (14 वा सामना ) (9-10 वाजता)
– दिलेर दिल्ली वि. चेन्नई चॅलेंजर्स (15 वा सामना) (10-11 वाजता)

You might also like