पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील आयकॉन ग्रुप लिटिल कुमार गोल्ड चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रावणी देवरे तर मुलांच्या गटात क्रिशय तावडे यांनी तर 10 वर्षाखालील मुलींच्या गटात काव्या देशमुख तर मुलांच्या गटात मनन अगरवाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रावणी देवरेने सृष्टी सुर्यवंशीचा 7-4 असा तर मुलांच्या गटात क्रिशय तावडेने जय थापरचा 7-0 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. 10 वर्षाखालील मुलींच्या गटात काव्या देशमुखने रित्सा कोंदकरचा 7-2 असा तर मुलांच्या गटात मनन अगरवालने शादृल खवलेचा 7-5 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी-
8 वर्षाखालील मुली- श्रावणी देवरे वि.वि सृष्टी सुर्यवंशी 7-4
8 वर्षाखालील मुले- क्रिशय तावडे वि.वि जय थापर 7-0
10 वर्षाखालील मुली- काव्या देशमुख वि.वि रित्सा कोंदकर 7-2
10 वर्षाखालील मुले- मनन अगरवाल वि.वि शादृल खवले 7-5