भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचा नवा अध्यक्ष बनणार असल्याचे जवळजवळ पक्के झाले आहे. त्याला या अध्यक्षपदावर अधिकृतरित्या 23 ऑक्टोबरला नियुक्त केले जाईल.
त्यामुळे सध्या गांगुलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याला अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात गांगुलीचा माजी संघसहकारी विरेंद्र सेहवागचाही समावेश आहे.
सेहवागने ‘देर हैं अंधेर नहीं’, असे म्हणत गांगुलीला बीसीसीआयचा अध्यक्ष बनणार असल्याने ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहे.
सेहवागने ट्विट केले आहे की ‘अभिनंदन दादा, देर हैं अंधेर नहीं. भारतीय क्रिकेटसाठी ही चांगली गोष्ट आहे. या पदामुळे तू जे आत्तापर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये प्रचंड मोठे योगदान दिले आहेस त्यात आणखी विस्तार व्हावा.’
*be an
— Virender Sehwag (@virendersehwag) October 15, 2019
47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. तो बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यानंतर त्याचा कार्यकाल पुढील 10 महिन्यांसाठी असणार आहे. तो मागील 5 वर्षे बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये पदाधिकारी होता.
बीसीसीयच्या नियमानुसार कोणत्याही पदापवर 6 वर्षे झाल्यानंतर त्या व्यक्तीला कूलिंग ऑफ पिरियड(विश्रांती) अनिवार्य आहे. त्यामुळे गांगुलीला पुढील 10 महिनेच या पदावर राहता येणार आहे.