खेळ म्हटलं की जय-पराजय ही गोष्ट अटळ आहे. त्यातही धावपटूंसाठी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे अगदी काही सेकंद, मिलीसेकंदानंही एखाद्या धावपटूचं पदक हुकतं. पण रविवारी (१२ सप्टेंबर) अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. एका धावपटूने स्पर्धा जिंकूनही त्याला विजेता म्हणून अपात्र ठरवण्यात आले. यामागे त्याने घातलेले शूज कारण ठरले आहेत.
नक्की काय झाले?
रविवारी व्हिएन्ना येथे मॅरथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी इथियोपियाचा धावपटू देरारा हुरिसाने अव्वल क्रमाकांवर राहात शर्यत जिंकली होती. पण, तो त्याचा विजय साजरा करत असतानाच, त्याला सांगण्यात आले की त्याचे यश अपात्र ठरत आहेत. कारण, त्याने नियमाला अनुसरुन शूज घातले नव्हते. दरेराने ३ सेंकदाच्या अंतराने शर्यत जिंकली होती.
चूकीचे शूज घातले
२४ वर्षीय देराराच्या शूजचा सोल ४ सेंटीमीटरपेक्षा १ सेंटीमीटरने जास्ट मोठा होता. नियमाप्रमाणे जास्तीत जास्त ४ सेंटीमीटरचे सोलची गरज होती. त्यामुळे देराराच्या विजयाला अपात्र करार देण्यात आला.
त्याच्या शूजबद्दल आयोजकांनी सांगितले की त्याने नोंदणी केलेले शूज नियमानुसार योग्य होते. मात्र, नंतर त्याने सरावावेळी तो वापरत असलेले शूज मुख्य स्पर्धात घातले.
त्यामुळे देराराकडून विजेतेपद काढून घेण्यात आले आणि या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या केनियाच्या लिओनार्ड लँगटला विजेता घोषित करण्यात आले. त्याने शर्यतीत २ तास, ९ मिनिट आणि २५ सेंकदाची वेळ नोंदवली होती. इथियोपियाचाच दुसरा धावपटू बेतेस्फा गेटाहुनला दुसरा क्रमांक देण्यात आला, तर केनियाच्या एडविन कोसगईला तिसरा क्रमांक देण्यात आला. महिलांची शर्यत केनियाची विबियन चेपकिरुई जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वीच सीएसकेला मोठा धक्का, सलामीवीराला झाली दुखापत
विविध कारणे देत ‘या’ पंधरा विदेशी खेळाडूंनी घेतली आयपीएल २०२१ मधून माघार
वेध आयपीएलचे! या संघांचा राहिलाय स्पर्धेत बोलबाला, तर सर्व हंगाम खेळूनही ३ संघांच्या पदरी अपयश