प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने बुधवारी (२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०ची रंगतदार लढत झाली. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या या लढतीत बेंगलोरच्या देवदत्त पडीक्कलने नेत्रदिपक झेल पकडला.
झाले असे की, मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या बेंगलोरने मर्यादित २० षटकात १६४ धावा केल्या. बेंगलोरच्या या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ८व्या षटकापर्यंत मुंबईची धावसंख्या २ बाद ५३ धावा इतकी झाली होती. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर मुंबईचा ३० वर्षीय फलंदाज सौरभ तिवारी फलंदाजीसाठी आला होता.
परंतु, बेंगलोरच्या गोलंदाजांनी त्याला एकही चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्याची संधी दिली नाही. त्यामुळे तो एक-दोन धावांची हळूवार सुरुवात करत चांगल्या संधीच्या प्रतिक्षेत होता. मात्र ११व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या मोहम्मद सिराजने त्याला पडीक्कलच्या हातून झेलबाद केले.
तिवारीने सिराजच्या षटकातील चौथा चेंडू हवेत टोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र मिड ऑफवर क्षेत्ररक्षणासाठी उभारलेल्या पडिक्कलने चपळतेने झेप घेत चेंडू दोन्ही हातांनी पकडला आणि तिवारीला पव्हेलियनला पाठवलं.
https://twitter.com/watsonmpaul/status/1321493196950642692
https://twitter.com/Nelsonjoshmj/status/1321495170542686208
https://twitter.com/bats9cantbowl/status/1321494166996545536?s=20
Stunning catch ft. Devdutt Padikkal. #IPL202 pic.twitter.com/9qFawkC5QT
— rea (@reaadubey) October 28, 2020
Need wicket…
As Im typing..Got one
Second one for siraj
And what a catch from Padikkal#RCBvMI #Ipl2020 pic.twitter.com/DE9Mdvaz2R— Aryan Rajput (@AryanRa93919722) October 28, 2020
#NowIsWow
Wicket! PADIKKAL! What a catch at mid off. Tiwary chips this shot in the air. A cross seamer, so it doesn't carry to him. Padikkal has to diver forward, and that's a stupendous catch. ???????????????? pic.twitter.com/aZvJJg2Zj7— #????♥️????BeingTechy???? Indian???????? (@abhilashp28645) October 28, 2020
पण त्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी बेंगलोरच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. त्यांनी केवळ १९.१ षटकात बेंगलोरचे आव्हान पूर्ण केले आणि ५ विकेट्सने सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये बळींचे शतक पूर्ण करणाऱ्या ‘बुमराह’सोबत अनोखा योगायोग; वाचून शाॅक व्हाल
आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलेला सुरेश रैना ‘या’ टीव्ही शोमधून येणार चाहत्यांच्या भेटीला
ट्रेंडिंग लेख-
SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर
Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय