भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याची होणारी पत्नी धनश्री वर्मा नेहमी चर्चेत असते. आपल्या नृत्याने तिने कित्येक चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडली आहे. त्यामुळे तिचे नाव काढले की चाहत्यांना तिच्या नृत्याची आठवण येते. नुकताच धनश्रीने सोशल मीडियावर नृत्य करतानाचा नवा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दाखवली आहे.
धनश्रीने नई धूप गाण्यावर केले नृत्य
धनश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नवा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत धनश्री २०२० वर्षाला निरोप देताना दिसत आहे. त्यासाठी तिने अत्यंत विशेष असे ‘नयी धूप’ हे गाणे निवडले आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले की, “या वर्षाला एका हलक्या नोटसोबत निरोप देऊयात. ‘नयी धूप’चे हे नवे गाणे किती आनंद आणि उत्साह घेऊन आले आहे.” धनश्रीच्या या व्हिडिओला चहलने कमेंटमध्ये दिलचा इमोजी पाठवला आहे.
https://www.instagram.com/p/CIzo1XuJz1E/?utm_source=ig_web_button_share_sheet
धनश्री नृत्य करण्याबरोबरच नृत्यदिग्दर्शकही आहे. ऑगस्ट २०२०मध्ये धनश्री आणि चहल यांचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी सर्वांना याविषयी माहिती दिली होती. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकेल. परंतु, अद्याप त्यांनी अधिकृतपणे लग्नाची तारिख जाहीर केलेली नाही.
महत्वाच्या बातम्या:
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– पृथ्वी शॉने टाकला ड्रीम बॉल; व्हिडिओ झाला व्हायरल
– मुशफीकूर रहीमने उगारला युवा खेळाडूवर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल