Loading...

टीम इंडियाला मोठा धक्का! हा मोठा खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यातील टी२० मालिकेतून बाहेर

24 जानेवारीपासून भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी20 मालिकेने भारताच्या या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

मात्र या टी20 मालिकेसाठी केवळ 3 दिवस उरले असताना भारताला मोठा धक्का बसला आहे. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार भारताचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन या टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे.

त्याला रविवारी(19 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा वनडे सामना खेळताना डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्याला या सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत असताना 5 व्या षटकात ऍरॉन फिंचने कव्हरच्या क्षेत्रात मारलेला चेंडू आडवण्याच्या नादात दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने या सामन्यात फलंदाजीही केली नाही.

मात्र अजून त्याच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. विशेष म्हणजे याच महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंका विरुद्धच्या टी20 मालिकेतून शिखरने गुडघ्याच्या दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन केले होते. आता तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे.

Loading...
You might also like
Loading...