fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विराट म्हणतो, माझ्या यशस्वी कर्णधार पदामागे आहे ‘या’ खेळाडूचा मोठा हात

Dhoni played a 'big role' in me getting captaincy: Virat Kohli

नवी दिल्ली। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार एमएस धोनी हे दोघे खूप जवळचे मित्र आहेत. विराटने धोनीचे बऱ्याच वेळा कौतुकही केले आहे.

धोनीने (MS Dhoni) २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडले होते, तेव्हा विराटने (Virat Kohli) धोनीबद्दल सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली होती. विराटने या पोस्ट मध्ये लिहलं होतं की, “माही भाई आप हमेशा मेरे कप्तान रहोगे.”

विराटने भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) बरोबर एका लाईव्ह चॅट दरम्यान त्याच्या आणि धोनीच्या संबंधांबद्दल सांगितले. धोनी बरोबर खेळलेले आपले अनुभव त्याने ताजे करत म्हणाला की, “जर आपण खेळाबद्दल बोललो तर मी धोनीकडून खूप शिकलो आहे. मी कायम स्लिपला उभा राहून त्याला सल्ला देत असायचो. काही वेळा तो सहमत असायचा, तर काही वेळा तो सहमत नसायचा. पण मला असे वाटते की त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला.”

“माझं कर्णधार बनणं, त्याच्या बरोबर खेळणं आणि त्याला बघणं माझ्या खूप कामी आलं आहे. त्यांनी माझ्या कर्णधार पदामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माझ्या कर्णधार पदामागे धोनीचा मोठा हात आहे आणि धोनीने माझं कर्णधारपद सुधारण्यासाठी खूप मदत केली आहे. असा विश्वास एका रात्रीत तयार होत नाही,” असेही तो पुढे म्हणाला.

धोनीने २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव झाल्यापासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेले नाही. उपांत्य सामन्यात पराभव झाल्यानंतर रांचीच्या या सुपुत्राने स्वत:ला मैदानापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला भारतीय सेने बरोबर दोन महिने काश्मीर येथे प्रशिक्षण घ्यायचे होती. धोनीने प्रशिक्षण संपल्यानंतरही संघाबरोबर खेळणं ठीक समजलं नाही.

त्यातच संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आलं त्यामुळे कोरोनाने धोनीला मैदानावर पुनरागमन करून दिले नाही. कारण आयपीएल अनिश्चित काळासाठी थांबवली गेली आहे.
काही दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीबद्दल बातम्या येत होत्या. पण त्याची पत्नी साक्षी आणि बालपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी त्याचे खंडन केले आहे.

संपूर्ण जगासह धोनी ही आपल्या घरात बंदिस्त आहे. त्याचे चाहते त्याला मैदानावर पाहण्यास उत्सुक आहेत, तर दुसरीकडे विराट ही लॉकडाऊनमुळे घरातच आहे. तो फिट राहण्यासाठी घरातच व्यायाम करत आहे. ज्याचे व्हिडिओ तो चाहत्यांबरोबर सोशल मिडियावर शेअर करत आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

खालच्या फळीत खेळणारे ३ खेळाडू, जे पुढे जाऊन बनले टीम इंडियाचे धुव्वांदार सलामीवीर

-क्रिकेटला टाटा- बायबाय करत दुसरा व्यवसाय करणारे ५ क्रिकेटर, सचिनचा एकेवेळचा संघसहकारीही आहे यात

-फोर्ब्स मासिकात ‘या’ भारतीय खेळाडूने मिळवले सलग दुसऱ्या वर्षी स्थान

You might also like